Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकृषी विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

कृषी विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

दिल्ली l Delhi

राज्यसभेत वादग्रस्त शेती विधेयक विरोधकांच्या गोंधळातच मंजूर करण्यात आले आहे. विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. पण कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी विधेयक सादर केले आणि त्यावर मतदान घेऊन मंजूर करण्यात आले. विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे की, “आपल्या देशातील शेतीला तात्काळ आधुनिक करण्याची गरज आहे. या विधेयकाच्या मदतीने भविष्यात शेतकर्यांना तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करणे सुकर होईल याने केवळ उत्पादनच वाढणार नाही तर आर्थिक फायद्या सुद्धा जवळपास दुप्पट होईल यामुळे शेतकर्यांना मदतच होणार आहे त्यामुळे हा निर्णय स्वागत करण्याजोगा आहे.”

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी विधेयकं मांडल्यावर. विरोधकांकडून सभागृहात गोंधळ घालण्यात आला. वेलसमोर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सोबतच विधेयकाची प्रत हिसकावण्याचा प्रयत्नही करण्यात आला. या सर्व विरोधावर यापुर्वी सुद्धा मोदींनी उत्तर देत तुम्हाला भटकावण्याचा प्रयत्न केला जात आहे असे नागरिकांना संबोधुन म्हंटले होते तर आज सुद्धा विरोध होत असला तरी ही विधेयकं शेतकरी बांधवांच्या किती हिताची आहेत यावरही मोदींनी भाष्य केले आहे. या विधेयका नंतरही MSP व्यवस्था, सरकारी खरेदी कायम राहणार आहे, असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या