काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक

काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ( Congress Party)विस्तारित कार्यकारिणीची बैठक आज, मंगळवारी नागपूर येथे होत आहे. बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुका, राज्यातील ज्वलंत समस्या या विषयावर य विचारमंथन करण्यात येणार आहे.

वाढती महागाई, बेरोजगारी, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा भ्रष्ट कारभार, आगामी विधान परिषद निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यासाठी पक्षाची रणनिती, भारत जोडो यात्रेचा संदेश राज्यभर पोहचवण्यासाठी विशेष अभियान राबवण्याबाबत तसेच हाथ से हाथ जोडो अभियानाबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आमदार प्रणिती शिंदे, कुणाल पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com