Thursday, April 25, 2024
Homeराजकीयभविष्यात राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू सेना भवन असेल - राऊत

भविष्यात राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू सेना भवन असेल – राऊत

मुंबई –

आणखी काही दिवस थांबा भविष्यातील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू शिवसेना भवनच असणार असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी

- Advertisement -

म्हटले आहे. सोमवारी (22 डिसेंबर) नाशिक आणि धुळ्यातील भाजप पदाधिकार्‍यांनी शिवसेनेत प्रवेश केला. संजय राऊत यांच्या उपस्थितीत मंगळवारी शिवसेना भवनात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली.

अनेक पक्षाचे कार्यकर्ते आपल्याकडे येत आहेत. तीन पक्ष एकत्र आल्याने येत्या काळात एकाच पक्षातून इनकमिंग होणार असल्याचे सूचक विधान संजय राऊत यांनी केले. आमचा एकही आमदार फुटणार नाही, असे विरोधक म्हणतात. पण काही दिवस थांबा, काय काय होतेय ते दिसेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला एकत्र निवडणूक लढण्याचे आवाहन केले आहे. त्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, पदवीधर-शिक्षक मतदारसंघात त्याची चाचणी झाली आहे. महाराष्ट्राच्या तीनही प्रमुख विभागांमध्ये एक छोटेसे युद्ध आम्ही केले आणि ते एकत्र जिंकले, असा टोला त्यांनी लगावला. बाळासाहेब सानप हे भाजपमध्ये गेले त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेचे नुकसान झाले का? या प्रश्नावर बोलताना ते आले तेव्हा कुठे फायदा झाला होता. नुकसानीचा प्रश्नच नाही, असा पलटवार संजय राऊत यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रात्र संचारबंदी लागू केल्याने विरोधक त्यावर टीका टिप्पणी करत आहेत. यावरही राऊत यांनी विरोधकांचा चांगलाचा समाचार घेतला. भाजपला टीका करण्यासंदर्भात भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. कारण टीका करण्यात त्यांचा हात कोणीही धरणार नाही. कोणत्याही विषयवार ते टीका करत आहेत. लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. लोकांना मारायचे आहे का? ब्रिटनमध्ये काय चालले आहे ते बघा. बरेच महिने पंतप्रधान मोदी हे परदेशात गेले नाहीत. त्यामुळे परदेशात काय चालले आहे, याची माहिती भाजपवाल्यांना नसेल तर ती त्यांनी घ्यावी, असा घणाघात राऊत यांनी केला. आपल्या आरोग्याचे रक्षण व्हावे म्हणून मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी लावली आहे. सरकार जागरूक आणि सावध असून हा कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला असेही ते म्हणाले.

दरम्यान, राज्यात सध्या फोडाफोडीच्या राजकारणाला भलताच जोर आल्याचे दिसत आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी अखेर भाजपमध्ये घरवापसी केली आहे. शिवसेनसाठी हा धक्का मानला जात आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येत्या काळात आणखी लोकांचे प्रवेश होणार असे सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या