ईडी सरकार लवकरच 'रनआऊट' होणार- रा. काँ. मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांची उपरोधिक टीका

ईडी सरकार लवकरच 'रनआऊट' होणार- रा. काँ. मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांची उपरोधिक टीका

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

कमी चेंडूवर जास्त धावा काढण्याच्या नादात हे ईडी सरकार लवकरच 'रनआउट' होईल, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (NCP Chief Spokesperson Mahesh Tapase)यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून केली. विश्वासघाताच्या आधारावर स्थापन झालेल्या शिंदे सरकार जास्त काळ टिकेल असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतील मेट्रो चाचणी ( Metro test in Mumbai ) वेळी बोलताना कमी चेंडूत जास्त धावा काढायच्या आहेत, असे विधान केले आहे. या विधानाचा तपासे यांनी समाचार घेतला. राजकीय लालसेपोटी ईडी सरकारकडून चुकीचे धोरण स्वीकारले जात नाही ना अशी शंका महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली आहे, असेही महेश तपासे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरातच्या हितासाठी 'बुलेट ट्रेन' चा निर्णय तत्परतेने घेतात. परंतु महाराष्ट्रातील अनेक विषयांवर निर्णय होत नाही असा ट्रॅकरेकॉर्ड ईडीसरकारचा आहे, असेही तपासे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com