मंत्रालयासमोरील शासकीय बंगल्यांंची नावे बदलण्याचा निर्णय

मंत्रालयासमोरील शासकीय बंगल्यांंची नावे बदलण्याचा निर्णय

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मंत्रालयासमोरील शासकीय बंगल्यांची Government bungalows in front of the Ministry नावे बदलण्याचा change in name निर्णय घेण्यात आला असून आतापर्यंत क्रमांकांवरून ओळखले जाणारे हे बंगले आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या forts of Chhatrapati Shivaji Maharaj नावाने ओळखले जाणार आहेत.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे Environment Minister Aditya Thackeray यांच्या अ-६ या बंगल्याचे रायगड Raigad असे तर आदिवासी विकास मंत्री के. सी पाडवी यांच्या अ- ५ या बंगल्याचे प्रतापगड Pratapgad असे नामकरण करण्यात आले आहे.

मंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या बंगल्याना गड किल्ल्यांची नावे द्यावीत म्हणून राज्यभरातील शिवप्रेमींनी सतत पाठपुरवठा केला होता. त्यांनी या संदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. उदय सामंत यांनी या प्रस्तावावर सकारात्मक पाठपुरवठा केला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतर अखेर मंत्र्यांच्या शासकिय निवास्थानांचे नामांतर करण्यात आले आहे.

त्यामुळे आता मंत्र्यांच्या शासकिय निवास्थानांना राज्यातील प्रसिद्ध गड आणि किल्यांचे नावे मिळाली आहेत. यासंदर्भातील अधिकृत पत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी यांनी मुंबई शहराच्या कार्यकारी अभियंत्यांना पाठवले आहे. या आदेशानुसार आता खालील बंगल्यांची नावे बदलण्यात आलेली आहेत.

बंगल्यांची नावे पुढीप्रमाणे

अ ३- शिवगड, अ ४- राजगड, अ ५-प्रतापगड , अ ६-रायगड , अ ९- लोहगड, बी १ -सिंहगड , बी २-रत्नसिंधू , बी ३ -जंजिरा , बी ४-पावनगड , बी ५-विजयदुर्ग , बी ६ -सिद्धगड , बी ७- पन्हाळगड , क १-सुवर्णगड , क २-ब्रह्मगिरी, क ३-पुरंदर, क ४-शिवालय, क ५ - अजिंक्यतारा, क ६- प्रचितगड, क ७- जयगड आणि क ८- विशाळगड

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com