Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याउद्धव ठाकरेंचा निर्णय बेकायदेशीरच! शिंदे सरकार घेणार नामांतराचे श्रेय

उद्धव ठाकरेंचा निर्णय बेकायदेशीरच! शिंदे सरकार घेणार नामांतराचे श्रेय

मुंबई | Mumbai

आज मुंबईत शिवसेनेचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शक्तीप्रदर्शन केले. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा नागरी सत्कार रविंद्रनाट्य मंदिर येथे करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) हल्लाबोल केला…

- Advertisement -

मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसैनिकांनी मला प्रोत्साहन दिले. आमच्यावर आरोप झाले की आम्ही बंडखोरी केली. आम्ही जबरदस्तीने आमदारांना गुवाहाटीला नेले. पण, हे सर्व लोक स्वखुशीने माझ्यासोबत आहेत. आमदार शहाजी बापू यांनी गुवाहाटीचे पर्यटन देशभर केले. आम्ही जबरदस्तीने कोणालाही नेले नाही.

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती

आम्ही सर्व आनंदाने राहत होतो. हे एक-दोन दिवसांचे काम नव्हते. सत्ता सोडून ज्याकडे काहीच नाही, त्या शिंदेसोबत हे लोक आले. मी आमदारांना विश्वास दिला होता, की मला माझी काळजी नव्हती. काही झाले तर सर्व मी माझ्या अंगावर घेईल. पण, तुमच्या राजकीय कारकीर्दीला काहीच होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.

राज्यात पावसामुळे ९९ बळी; नाशकात ‘इतके’ दगावले

ते पुढे म्हणाले की, नामांतरण चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. उद्या आम्ही कॅबिनेट बैठक (Cabinet Meeting) घेऊन हा निर्णय पुन्हा घेणार आहोत. औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) नामांतराचा निर्णय आम्ही उद्या कॅबिनेटमध्ये घेऊ. सरकार अल्पमतात असताना कॅबिनेट घेतली.

शिवसैनिकांच्या जीवावर याल तर याद राखा; उद्धव ठाकरे आक्रमक

२००-३०० निर्णय घेतले ही कॅबिनेट बेकायदेशीर होती. उद्या अधिकृत कॅबिनेट घेऊन या निर्णयांवर शिक्कामोर्तब करू, असेदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या