काँग्रेसमध्ये अध्यक्ष बदलाचे वारे; डिजिटल पद्धतीने होणार निवड

काँग्रेसचा ऐतिहासिक निर्णय
काँग्रेस
काँग्रेस

दिल्ली | Delhi

बिहार विधानसभा निवडणुकीतही मोठी हार पत्करावी लागल्याने आता काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्षाच्या निवडीचे वारे वाहू लागले आहे. काँग्रेसचा आगामी अध्यक्ष डिजीटल पद्धतीने निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं असून पक्षाचा अध्यक्ष डिजीटलपद्धतीनेच निवडला जाणार असल्याचंही अधोरेखित झालं आहे.

ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (AICC) च्या सदस्यांकडून डिजिटल आयडी कार्ड उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. पक्षातील 'सेंट्रल इलेक्शन अथॉरिटी' मतदारांची यादी बनवण्याचं काम सुरू आहे. अथॉरिटीकडून स्टेट युनिटसकडे एआयसीसी प्रतिनिधींचा डिजिटल फोटो मागवण्यात आला आहे. जवळपास १५०० प्रतिनिधी या निवडणुकीत सहभागी होणार आहेत. विरोधकांकडून राहुल गांधी यांच्यासाठी एका नव्या मंचाची तयारी केली जात असल्याचं म्हटलं जातंय. परंतु, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राहुल यांच्याऐवजी इतर कुणी उभं राहीलं तर उत्सुकता नक्कीच ताणली जाईल.

एआयसीसी प्रतिनिधींची यादी २०१७ प्रमाणेच असेल. यादीत काही बदल आणि सुधारणेचं काम सुरू आहे. यंदा प्रत्येक प्रतिनिधिच्या आयडी कार्डवर एक बारकोडही राहणार आहे. त्यावर, प्रत्येक मतदात्याची संपूर्ण माहिती असेल. लवकरच हे पक्षाचं मतदार कार्ड नेत्यांना पाठवण्यात येईल. या निवडणुकीत निवडून येणारा नेता पक्षाच्या सध्याच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची जागा घेणार आहे. काँग्रेसच्या अध्यक्षाचा कालावधी दोन वर्षांचा असेल.

या निवडणुकीत राहुल गांधी विजयी झाल्यास तेच पक्षाचे निर्विवाद नेते असून सर्वात लोकप्रिय नेते असल्यावरही शिक्कामोर्तब होणार आहे. परंतु, अध्यक्षपदाचे दावेदार वाढल्यास सेंट्रल इलेक्शन ऑथोरिटीला पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार असल्याचं बोललं जात आहे. यात बॅलेट मतदानाचाही समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com