आमदार नियुक्तीप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

आमदार नियुक्तीप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

योग्‍य निर्णय घेण्याचे राज्‍यपालांचे आश्वासन

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

जवळपास १० महिन्यांपासून रखडलेल्या विधानपरिषदेतील राज्‍यपाल नामनियुक्‍त १२ आमदारांच्या ( 12 MLAs nominated by the Governor ) प्रश्नावर मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्यसह उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar ) आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ( Revenue Minister Balasaheb Thorat )यांनी बुधवारी राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari )यांची भेट घेतली.

यावेळी राज्‍यपालांना राज्‍यातील एकूण परिस्‍थितीची माहिती देण्यात आली. तसेच या नियुक्‍तीबाबत लवकर निर्णय घ्‍यावा अशी विनंती त्‍यांना करण्यात आली.यावेळी राज्‍यपालांनी आपण योग्‍य निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्‍याची माहिती अजित पवार यांनी भेटीनंतर दिली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ६ नोव्हेंबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीच्या पत्रानिशी बंद लाखोट्यात राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना सादर केली होती. मात्र, या यादीवर अजून निर्णय झालेला नाही. विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त सदस्यांचा विषय न्यायालयातही गेला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री राज्‍यपालांची भेट घेणार असे ठरले होते.गेल्‍या आठवडयातच ही भेट होणार होती.मात्र राज्‍यपालांचे अन्य काही कार्यक्रम असल्‍याने ही भेट टळली.

आज अखेर ही भेट झाली.आपण या प्रकरणी योग्‍य तो निर्णय घेऊ असे आश्वासन राज्‍यपालांनी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांना दिले आहे.दरम्‍यान,या १२ मधील काही नावांबाबत राज्‍यपालांचा आक्षेप असल्‍याची चर्चा सुरू होती.मात्र राज्‍यपालांनी असा कोणत्‍याही नावाला आक्षेप असल्‍याचे सांगितलेले नाही.त्‍यामुळे या १२ नावांना लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.विधिमंडळ अधिवेशन काळात विधानपरिषदेत कमी संख्याबळ असते ही बाब राज्‍यपालांच्या निदर्शनास आणून दिल्‍याचे पवार यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यातील कोरोनाची स्‍थिती,मराठवाडा तसेच उत्‍तर महाराष्‍ट्रात नुकतीच झालेली अतिवृष्टी,धरणांची स्‍थिती अशा अनेक विषयांची तपशीलवार माहिती राज्‍यपालांना देण्यात आल्‍याचेही अजित पवार यांनी सांगितले.

सर्व जातीधर्मांतील बांधवांना सोबत घेऊन जाणारे आमचे सरकार आहे.सणवार साजरे करणे आवश्यकच असते.पण त्‍याचसोबत माणसांचा जीव वाचविण्यास महाविकास आघाडी सरकारचे प्राधान्य आहे.काही जण आता सण साजरे करण्याचा विषय काढत आहेत. पण आम्‍ही जनतेच्या जिविताचे रक्षण करण्याचे कार्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्‍वाखाली करत असल्‍याचेही अजित पवार म्‍हणाले.

जन आशीर्वाद यात्रेनंतर परिवहन मंत्री अनिल परब यांना नोटीस आली, ही वस्‍तुस्‍थितीच आहे.पण ज्‍या संस्‍था चौकशी करत असतील त्‍यांना सहकार्य करणे हे आपले कामच असते.पण वैद्यकीय असेल वा इतर कारणांसाठी चौकशीसाठी हजर राहण्यास सोयीची वेळ मागता येते.त्‍यानुसार मंत्री म्‍हणून परब यांचे कार्यक्रम आधीच ठरले असल्‍याने त्‍यांनी तशी पुढची वेळ मागितली असावी , असेही पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com