'या' उमेदवाराला गाठायची पराभवाची शंभरी; आतापर्यंत झालेत ९३ वेळा पराभूत

'या' उमेदवाराला गाठायची पराभवाची शंभरी; आतापर्यंत झालेत ९३ वेळा पराभूत

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

कुठलीही निवडणूक (Election) असो, उमेदवार जिंकण्याच्या उद्देशानेच रिंगणात उतरतो. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा उमेदवाराची कहाणी सांगणार आहोत की, ज्याने आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. पण निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे तर निवडणुकीत पराभव व्हावा म्हणून. तर जाणून घेऊया नक्की ही व्यक्ती आहे तरी कोण...

सध्या उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभेत अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. मात्र एक व्यक्ती पराभव व्हावा म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठरवत आहे. वैशिष्ट्य असे की, या उमेदवाराने आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या ९३ निवडणुका लढवल्या आहेत. सर्व निवडणुकांमध्ये त्याचा पराभव झाला आहे.

तरीदेखील त्याने ९४ व्यावेळेस निवडणूक लढविण्यासाठी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीला तब्बल १०० वेळा निवडणुकीत पराभव होण्याचा विक्रम करायचा आहे. या व्यक्तीचे नाव हसनू राम (Hasnu Ram) आहे. ते ७५ वर्षांचे आहेत. खेरागड तहसीलमधील नगला दूल्हा येथील रहिवाशी असणाऱ्या हसनू यांच्या या निवडणुकीच्या पराभवाची कहाणी फारच रंजक आहे.

अशी आहे हसनू राम यांची कहाणी

एका बड्या पक्षाने हसनू राम यांना ३६ वर्षांपूर्वी निवडणुकीचे तिकीट देण्याचे आश्वासन दिले. पण, अगदी शेवटच्या क्षणी त्यांना तिकीट नाकारण्यात आले. यामुळे हसनू राम यांना खूप मोठा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी ठरवले की सर्व निवडणुका लढवायच्या.

हसनू राम राजस्व विभागात कार्यरत होते. निवडणुकांसाठी त्यांनी आपली नोकरीदेखील सोडली. नोकरी सोडल्यानंतर त्यांना एका पक्षाकडून तिकीट मिळाले नाही. नंतर त्यांनी महापालिका निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्वच निवडणुका लढवण्याचे ठरवले.

...यामुळे होऊ लागले पराभूत

हसनू राम यांनी एका पक्षाकडे तिकीट मागितले असता. त्यावर त्या पक्षाच्या नेत्यांनी हसनू यांना तुला तर तुझा शेजारीही मत देणार नाही. तू निवडणूक लढून काय करणार?, असा प्रश्न विचारला. पराभव पचवण्याची तयारी पाहिजे या उद्देशाने हसनू हे प्रत्येक निवडणूक लढवू लागले आणि त्यात पराभूत होऊ लागले.

मला थांबवू शकत नाही

हसनू राम यांनी म्हटले आहे की, मला १०० वेळा निवडणुकीत पराभव होण्याचा विक्रम करायचा आहे. मला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com