जिल्ह्यात विकासकामांचा अनुशेष भरुन काढणार

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची ग्वाही : राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेचा समारोप
जिल्ह्यात विकासकामांचा अनुशेष भरुन काढणार

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यातील नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे. मिळालेल्या सत्तेचा जिल्ह्यातील विकासकामांचा अनुशेष दूर करण्यासाठी उपयोग करा. शरद पवारांचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. काही समस्या अडचणी असतील, तर थेट संपर्क साधा, मी माझ्या पध्दतीने त्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करेल असे आश्वासनही मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिले.

खान्देशातील राष्ट्रवादी काँग्रेस परिसंवाद यात्रेचा शनिवारी जळगावात समारोप झाला. यावेळी छत्रपती संभाजी नाट्यगृहात झालेल्या जळगाव शहर व महानगराध्यक्षांच्या कार्यक्रमात मंत्री जयंत पाटील बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सालकर, जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अल्पसंख्याक सेलचे गफ्फार मलिक, माजी आमदार मनीश जैन, जळगाव महानगरध्यक्ष अभिषेक पाटील आदीं उपस्थित होते.

विकासाचा अनुशेष भरुन काढणार

पुढे बोलतांना मंत्री जयंत पाटील म्हणाले की, अडीच दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात आहे. रात्री अडीच वाजेपर्यंत कार्यक्रमासाठी कार्यकर्ता थांबून राहतो असे नशिराबाद येथील उदाहरण देत मी भारावलेा असल्याचे ते म्हणाले. यावरुन लक्षात येत की, जिल्ह्यात शरद पवार यांना माननारा मोठा वर्ग आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी फळी आहे. एकनाथराव खडसे यांच्या पक्षातील प्रवेशामुळे ताकद वाढली आहे.

नवी पिढी पक्षांची जुळली जातेय. हीच नवी पिढी भविष्यात पक्षांचा चेहरा होईल. मिळालेल्या सत्तेचा जिल्ह्यातील विकासकामांचा अनुशेष दूर करण्यासाठी उपयोग करा. शरद पवारांचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. काही समस्या अडचणी असतील, तर थेट संपर्क साधा, मी माझ्या पध्दतीने त्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करेल असे आश्वासनही मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com