भाजप आमदार नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

भाजप आमदार नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

मुंबई | Mumbai

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक (Sindhudurg DCC Bank Election) प्रचारात १८ डिसेंबर रोजी कणकवलीत शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab Case) यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य संशयीत आरोपी सचिन सातपुते (Sachin Satpute) यास गजाआड करण्यात आले आहे. सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी (Sindhudurg Police) दिल्लीमधून मोठ्या शिताफीने अटक केल्याची माहिती मिळत आहे.

भाजप आमदार नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

या प्रकरणावरून नितेश राणेंविरोधात (Nitesh Rane) शिवसेना (Shivsena) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणातील सूत्रधाराला अटक करा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naiik) यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात शिवसेना आक्रमक झाली आहे. या हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना अटक होण्याची शक्यता आहे. यासाठी पोलिसांकडून मोठी फिल्डिंग लावण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. पोलिसांनी नितेश राणे यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, ते गैरहजर होते. त्यामुळे आता पोलिसांनी अटकेची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

भाजप आमदार नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

दरम्यान या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शंका व्यक्त केली असून, त्यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नितेश राणेंना अटक होण्याबद्दलच्या वृत्तावर भाष्य केलं. राणे म्हणाले, 'कसली अटक? काय केलंय नितेश राणेंनी? सत्तारुढ लोकांचा जिल्हा बँकेत पराभव होईल म्हणून सुडाच्या भावनेतून हे सुरू आहे. केस दाखल केलीये की नाही, मला माहिती नाही. काल मी जिल्ह्यात होतो, पण तोपर्यंत काही झालेलं नव्हतं. हे सुडाच्या राजकारणातून चाललं आहे', असं राणे म्हणाले.

नितेश राणे अज्ञातवासात गेल्याच्या वृत्तावर बोलताना राणे म्हणाले, 'अज्ञातवासात नाहीये. नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे. अज्ञातवासात जायची आम्हाला काही गरज नाही. ते आमदार आहेत. त्यामुळे अज्ञातवासात वगैरे काही नाही. अटक करण्याच्या बातम्या दिल्या जात असतील, तर आम्ही न्यायालयात तर जाणारच', असं राणे यांनी म्हटलं आहे.

भाजप आमदार नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?
Salman Khan: सापाने मला पहिलं बर्थडे गिफ्ट दिलं; सलमानची प्रतिक्रिया

तसेच या प्रकरणात आपल्याला अडकवले जात असल्याचा आरोप आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane Alleges on Government ) यांनी केला आहे. जिल्हा बँक निवडणुकीत भाजपप्रणीत पॅनलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संतोष परब खुनी हल्ला प्रकरणात आपली चौकशी करून या प्रकरणांमध्ये आपल्याला गुंतवले जात आहे, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.

भाजप आमदार नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

Related Stories

No stories found.