Thursday, April 25, 2024
Homeनाशिक'त्या' दलालांना...; नाशकात ठाकरे गट आक्रमक

‘त्या’ दलालांना…; नाशकात ठाकरे गट आक्रमक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकमधील शिंदे गटाने (Shinde Group) ठाकरे गटाला (Thackeray Group) मोठा धक्का दिला आहे. अजय बोरास्तेंसह ११ माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता नाशिकमधील ठाकरे गट आक्रम झाला आहे. ठाकरे गटाने आज पत्रकार परिषद घेत शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांचा जोरदार समाचार घेतला आहे….

- Advertisement -

पत्रकार परिषदेत विजय करंजकर म्हणाले की, ज्यांनी पक्षप्रवेश केला त्यांच्या वतीने अजय बोरस्ते बोलले. शिवसेनेत १० ते १२ वर्षांचा आहे. यात त्यांनी सगळी पदे उपभोगली. तरीही त्यांनी असे वक्तव्य करणे हे अत्यंत घृणास्पद आहे.

आम्ही आढावा घेतला त्यात आठ ते नऊ नगरसेवक आहेत. जे सोडून गेले त्यापैकी बहुतेक लोक दुसऱ्या पक्षातून आले होते. खरे पाहिले तर पक्षातून दोनच निष्ठावान लोक गेलेत. आम्हाला खेद इतकाच आहे की, हे लोक पक्षातल्या निष्ठावान लोकांना घेऊन जाण्यात यशस्वी ठरले.

पुढील काळात हा पक्ष हा अत्यंत ताकतीने जिद्दीने कट्टरपणे उभा राहिल. शिवसेनेत कट्टर लोकांची कमी नाही, ज्यांना ज्यांना पक्षामध्ये सर्व काही मिळाले, ते गेले, परंतु ज्यांनी या पक्षामध्ये राहून यांना पुढे नेले, ते लोक मात्र आजही याच पक्षामध्ये आहे, त्यामुळे तरीही आम्हाला चिंता नाही. दलालांना भुईसपाट करण्यासाठी आमचा पक्ष सक्षम आहे. त्यांना जागा दाखवून राहिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा करंजकर यांनी दिला आहे.

नाशिकमधील माजी नगरसेवक शिंदे गटात; संजय राऊत म्हणाले…

ते पुढे म्हणाले की, काही लोकांनी दोन दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्यासोबत जेवण केले. मात्र खाल्ल्या मिठाला लोक जागत नसतील, अशा पद्धतीने वागत असतील तर मग समाजात तुमच्याविषयी अनास्था निर्मांण झाल्याशिवाय राहत नाही.

संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आल्यावर ज्या ज्या नगरसेवकांच्या तक्रारी होत्या, त्या ऐकून घेण्याकरिता राऊत यांनी काही वेळ राखून ठेवला होता. त्यानंतर स्वतः राऊत हे व्यक्तिशः त्या लोकांशी बोलले. पण त्या त्या लोकांनी ज्या ज्या सूचना केल्या, त्या त्या सूचनांचे यानंतर ताबडतोब अंमलबजावणी करेल, अशा शब्दांमध्ये राऊत यांनी त्यांना सांगितले.

सिल्व्हर ओकचे दलाल कोण हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत; अजय बोरस्तेंचा राऊतांना टोला

मात्र दोन दिवसाचा कालखंड उलटत नाही तोच अशा प्रकारचे वर्तन करणे म्हणजे हे स्वतःचा आत्मघात करून घेणे किंवा विश्वासघात करणे आहे, असे करंजकर म्हणाले. या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख विजय करंजकर, सुनील, सुधाकर बडगुजर आदींसह ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या