Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्या“५० खोक्यांसाठी आपला आत्मा विकलेल्यांनी...”; शिरसाटांच्या ‘त्या’ विधानाला प्रियंका चतुर्वेदींचे सणसणीत प्रत्युत्तर

“५० खोक्यांसाठी आपला आत्मा विकलेल्यांनी…”; शिरसाटांच्या ‘त्या’ विधानाला प्रियंका चतुर्वेदींचे सणसणीत प्रत्युत्तर

मुंबई । Mumbai

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष तीव्र होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडील काळात ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानाला ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -

ठाण्यातील मेळाव्यात केलेल्या भाषणात प्रियंका चतुर्वेदी यांनी गद्दारांना माफी नाही, असे म्हटले. प्रियंका चतुर्वेदी खरे तर काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या. तेथून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी आमचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी अत्यंत भयानक वक्तव्य केले होते. खैरेंनी सांगितले की, आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदींचे सौंदर्य पाहून त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले. यावरून नवा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात असून, यावर प्रियंका चतुर्वेदी यांनी पलटवार केला आहे.

VIDEO : महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही; फडणवीसांचा संभाजी भिडेंना इशारा

संजय शिरसाटांना उत्तर देताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की,” मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे? हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने ५० खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला. संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे, ते त्यांच्या टिप्पण्यांमधून स्वतःचे असभ्य चारित्र्य निश्चितपणे प्रदर्शित करतात, यात आश्चर्य नाही की भाजपने त्यांना त्यांच्यासोबत ठेवले आहे.”

प्रियंका यांच्या या ट्विटनंतर शिरसाट यांनीही एका ट्विटद्वारे त्यावर उलट हल्ला चढवला आहे. ‘आपण कश्या दिसता किंबहुना आपल्या भाषेत सांगायचे झाले तर चरित्र्याचे धिंधवडे आपल्याच पक्ष्यातील श्रीमान खैरे यांनी उडवले आहेत… आपण जे मला विचारत आहत ते त्यांना विचारलं असतं तर अधिक संयुक्तिक ठरलं असतं…आम्ही कुठं तुम्हाला विचारलं की तुम्हांला का.मत ? असो द्यायचं.. गद्दारी तर स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांशी कोणी केली ते दहा पक्ष फिरून आलेल्या कालच्या उपऱ्यांना काय कळणार ? आत्मा… प्रामाणिकपणा… काय छान बोलता… जसं सामान्य कार्यकर्त्या सारखं पोस्टर बॅनर लावंत घाम गाळून खासदार झालाय.. खरा खासदारकी वर हक्क…चंद्रकांत खैरे… दिवाकर रावते…ह्या राबणाऱ्या कार्यकर्त्यांचा होता.. पण तुमची बात जर न्यारी…जाल तिकडे भारी,’ असे शिरसाट यांनी म्हटले आहे.

संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले होते?

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेंदीबद्दल वक्तव्य केलं होतं. यावेळी त्यांनी यामध्ये चंद्रकांत खैरेंचाही उल्लेख केला होता. ते म्हणाले की, “मला खैरे म्हणाले की, आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेंदींना त्यांचं सौदर्य बघून खासदारकी दिली.”त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद पडताना दिसले. तत्पूर्वी संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही वक्तव्य केलं होतं. यावेळी त्यांनी आरोप लावला की उद्धव ठाकरे आनंद दिघेंच्या अंतयात्रेच्या वेळी आले नाहीत. कारण ते जर आले असते, तर जनतेनी त्यांना दगडं मारली असती.

- Advertisment -

ताज्या बातम्या