
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (Shivsena) उठाव केल्यानंतर शिवसेनेत ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गट (Shinde Group) असे दोन गट पडले. दोन्ही गटाकडून शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात आला...
दोन्ही गटाकडून दावा करण्यात आल्याने निवडणूक आयोगाने अंतिम निकाल येईपर्यंत पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले होते.
काल निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्षाचे नाव एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्यात आले आहे.
धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाल्याने ठाकरे गटाला 'मशाल' चिन्हाचाच वापर करावा लागणार आहे. मात्र आता मशाल चिन्हावरही समता पक्षाने दावा केला आहे. यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढणार असल्याची माहिती मिळत आहे.
ठाकरे गटाला देण्यात आलेले मशाल चिन्ह गोठवण्यात यावे, अशी मागणी समता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. आज समता पक्षाचे शिष्टमंडळ याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगात जाणार आहे. समता पक्षाचे अध्यक्ष उदय मण्डल यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेणार आहे.