Wednesday, April 24, 2024
Homeराजकीय'तो' व्हिडिओ व्हायरल होताच भाजपा नेत्याचा राजीनामा, नेमकं प्रकरण काय?

‘तो’ व्हिडिओ व्हायरल होताच भाजपा नेत्याचा राजीनामा, नेमकं प्रकरण काय?

दिल्ली | Delhi

तामिळनाडूमधील (Tamil Nadu) भाजपाचे (BJP) सचिव आणि राज्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित प्रमुख नेत्यांपैकी एक के. टी राघवन (K T Raghavan) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (resigns) दिला आहे. पक्षातीलच दुसऱ्या एका नेत्याने युट्यूबवर (YouTube) स्टिंग व्हिडिओ व्हायरल (Sting video viral) केल्यानंतर राजीनामा दिला आहे.

- Advertisement -

व्हिडिओमध्ये राघवन (K T Raghavan video) यांच्यासारखा एक व्यक्ती पक्षाच्या एका महिला कार्यकर्त्यासोबत अश्लील व्हिडिओ कॉलवर (Pornographic video calls) असल्याचं दिसतं. हा व्हिडिओ पक्षाचे नेते मदन रविचंद्रन (Madan Ravichandran) यांनी युट्यूबवर शेअर केला आहे. दरम्यान, केटी राघवन यांनी याच्याशी आपला काही संबंध नाही असं म्हटलं आहे. तसंच याप्रकरणी कायदेशीर कारवाई करू असा इशाराही दिला आहे.

यावेळी के टी राघवन म्हणाले की, “तामिळनाडूचे लोक, पक्षाचे कार्यकर्ते आणि जे माझ्याबरोबर आहेत त्यांना माहीत आहे की मी कोण आहे? गेली 30 वर्षे मी कोणत्याही फायद्याशिवाय पक्षाचं काम करत आहे. राघवन यांनी पुढं लिहिलं की, “सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओबाबत मला कळलं आहे. माझी आणि पक्षाची प्रतिमा मलीन करण्यासाठी हा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. मी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. पण माझ्यावर झालेले सर्व आरोप खोटे आहेत. शेवटी न्यायाचाच विजय होईल. “

- Advertisment -

ताज्या बातम्या