साखर कारखाने शेतकर्‍यांनीच चालवावे

साखर कारखाने शेतकर्‍यांनीच चालवावे

पुणे |प्रतिनिधी| Pune

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे राज्यातील १२ सहकारी साखर कारखाने भाडे तत्वावर देण्यासाठी निविदा मागविण्याबद्दल जाहीरात काढण्यात आली आहे. शेतकर्यांच्या मालकीच्या कारखान्यांचे नव्या स्वरुपातील खाजग़ीकरणाचा डाव शेतकरी हाणून पाडतील. वास्तविक संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे जर संस्था तोट्यात आलेली असल्यास सदर संचालकांवर कारवाई करण्या एैवजी संस्थाच मोडीत काढण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही. पहिल्यांदा सदर साखर कारखान्यांच्या तत्कालीन संचालकांची मालमत्ता जप्त करून बॅंकेने वसुली करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. दरम्यान, खाजगी संस्थानी या निविदा प्रक्रीयेत सहभागी होऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

राजू शेट्टी यांनी सांगितले की १) गंगापुर, २) जिजामाता , विनायक , ३) शिवाजीराव पाटील निलंगेकर लातुर , ४) ५) डॉ पद्मश्री वि.वि.पा लातुर , ६) गजानन , बीड , ७) पांझराखान धुळे ८) जयजवान लातुर ९) सांगोला सोलापुर १०)यशवंत पुणे ११) बापुराव देशमुख वर्धा १२) जय किसान यवतमाळ हे सहकारी साखर कारखाने दिर्घ मुदतीच्या कराराने भाडे तत्वावर देण्यासाठी राज्य सहकारी बँकेने निविदा काढल्या आहेत.

पुण्या जवळील यशवंत सहकारी साखर कारखाना अवसायनात काढतांना राज्य सहकारी बँकेचे केवळ १८ कोटी रुपये थकित कर्ज होते , संस्थेची २४८ एकर जमीनीचे मुल्यांकन केवळ अडीच कोटी रुपये पकडुन संस्था बोगस रित्या दिवाळखोरीत काढण्यात आली. यशवंत कारखान्याच्या सभासदांनी एक रक्कमी कर्ज परत फेड योजनेतून भागभांडवल वाढवून कारखाना ताब्यात घेण्यासाठी तयारी दर्शविली त्यासाठी बॅंकेत खाते उघडण्याची परवानगी मागितली पण त्यांना परवानगी न देता त्या विरुद्ध सभासद शेतकर्यांनी मा.उच्च न्यायलयातून मनाई हुकुम घेतलेला असतांना देखील राज्य सहकारी बँक कारखाना भाडे तत्वावर देण्यासाठी अतिउतावळी का ? या सर्व घटनेमागील झारीतील शुक्राचार्य कोण आहेत. असा सवाल उपस्थित होतो. वरील सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या फेर निवडणुका घेत सभासदांना संस्थेचा कारभार करण्यासंदर्भांत निर्णय घेऊ दिला पाहीजे असे मत त्यांनी मांडले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com