चित्रा वाघ यांच्या 'त्या' वक्तव्यावर सुषमा अंधारेंचा पलटवार

चित्रा वाघ यांच्या 'त्या' वक्तव्यावर सुषमा अंधारेंचा  पलटवार

मुंबई | Mumbai

सध्या महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवरायांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नवरून (Maharashtra-Karnataka border issue) वाद चिघळला असून विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यानंतर आता भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Aandhare) यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे...

चित्रा वाघ यांनी 'प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आमची नक्कल करून अंधारे शिट्ट्या आणि टाळ्या मिळवतात. मात्र मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने (MahaVikas Aghadi Government) काय दिवे लावले हे जरा महाराष्ट्राला सांगा. त्यांच्या प्रत्येक विधानावर बोललेच पाहिजे, असे काहीही नाही. त्या त्यांचे काम करत आहेत, आम्ही आमचे काम करत राहू. असे कितीही आडवे आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आमचे नाव घेऊन त्यांचे दुकान चालत असेल, तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे म्हणत अंधारेंना टोला लगावला होता.

दरम्यान, त्यावर आता अंधारेंनी ट्वीटद्वारे प्रत्युतर देत 'स्वतःच्या राजकीय करिअरसाठी भटक्या विमुक्तातील पूजा चव्हाणसारख्या (Pooja Chavan) एका माऊलीच्या अब्रूचे खोबरं उधळणाऱ्या चित्रा वाघ यांनी आधी मंत्रिमंडळात बसून अचकट विचकट बोलणाऱ्या मंत्र्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यावे असे म्हणत वाघ यांना सल्ला दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com