Sushant Singh case : भाजपच्या आक्षेपाचा विखेंकडून खुलासा... सांगीतले हे कारण

माजी मंत्री आ. विखे पाटील : मुंबईच्या गाळामध्ये किती लोकांचे हात गुंतले
Sushant Singh case : भाजपच्या आक्षेपाचा विखेंकडून खुलासा... सांगीतले हे कारण

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

अभिनेता सुशांतसिंह राजपूत sushant singh आत्महत्येच्या प्रकरणात मुंबई mumbai police पोलिसांवर भाजपचा bhartiy janata party आक्षेप कधीच नव्हता. आमचा आक्षेप मुंबई पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावाला आहे, असा आरोप भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील radhakrishna vikhe patil यांनी सत्ताधार्‍यांवर केला. देशात सर्वात भ्रष्ट पालिका म्हणून मुंबई महापालिकेचा उल्लेख होतो.

विरोधीपक्षनेता असतानाही मी हा आरोप केला आहे. ही महापालिका म्हणजे प्रचंड भ्रष्टाचाराने पोखरलेली व्यवस्था आहे. मुंबईच्या गाळामध्ये किती लोकांचे हात गुंतले आहेत, याचाही शोध घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील फाउंडेशनच्यावतीने विळदघाट येथे कै. श्रीमती सिंधुताई विखे पाटील कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात आलं आहे. त्याच्या लोकार्पण सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आ. विखे म्हणाले, सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयला देण्याची मागणी भाजपने सातत्याने लावून धरली. त्याला उत्तर देताना भाजपचा मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याचा आरोप शिवसेनेने केला होता.

शिवसेनेच्या या आरोपाचे विखे-पाटील यांनी यावेळी खंडण केलं. मुंबईचं पोलीस दल हे जगातील एक उत्कृष्ट पोलीस दल आहे. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल कोणालाही शंका नाही. राज्य सरकारकडून त्यांच्यावर येत असलेल्या दबावाला आमचा आक्षेप आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांची जी वेगवेगळी विधाने समोर येताहेत, त्यामुळे देखील संशयाला जागा आहे, असे विखे म्हणाले.

मुळात राज्य सरकारकडे काही लपवण्यासारखे नसेल तर सीबीआय चौकशीला परवानगी का दिली जात नव्हती? सत्य बाहेर आलेच पाहिजे. कुणा व्यक्तीच्या विरोधात आमची भूमिका नाही. मात्र, या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. राजकीय नेते, बॉलिवूड व अंडरवर्ल्डचाही संबंध आहे. त्यामुळे राज्य सरकारने सीबीआय चौकशीची मागणी मान्य करण्यास हरकत नव्हती. आता सीबीआयनं प्रकरण हाती घेतलंच आहे तर सत्य बाहेर येईल, असंही ते म्हणाले.

मुंबई महापालिका म्हणजे त्याच नाल्यातील गाळ काढायचा, त्याची बिले करायची व पुन्हा त्याच नाल्यात तो गाळ जातो, अशी परिस्थिती आहे. मुंबईच्या गाळामध्ये किती लोकांचे हात गुंतलेले आहेत, याचा शोध घेण्याची गरज आहे. मला वाटते आता याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली तर राजकारण सुरू केले होईल.

आज मुंबईची जी दुर्दशा झाली आहे, पाणी जाण्यास जागा नाही, पाणी साचले आहे. मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेचे हाल होतात. याला संपूर्णतः मुंबई महापालिका व ज्यांच्या अधिपत्याखाली गेली पंचवीस वर्षे ही महापालिका कार्यरत आहे ती शिवसेना जबाबदार आहे, असेही ते म्हणाले.

लॉकडाऊनची भूमिका स्पष्ट करावी, म्हणजे जबाबदारी निश्चित करता येईल

नगर जिल्ह्यात जेवढे आमदार आहेत, त्यांनी लॉकडाऊन बाबत भूमिका स्पष्ट करावी. लॉकडाऊन करणे योग्य की अयोग्य याबाबत भूमिकास स्पष्ट करावी. म्हणजे कारण उद्या जे चांगले किंवा वाईट परिणाम होतील यांची जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे. करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे ट्रेसिंग करण्यासाठी 5 दिवस कडक लॉकडाऊनची मागणी होती. पण ती टाळली गेली, त्याचे परिणाम दिसत आहेत, रोज रुग्ण संख्या शेकड्याने वाढत आहेत. शिवाय मी जिल्ह्यात नव्हे तर केवळ नगर मनपा हद्दीत लॉकडाऊनची गरज व्यक्त केली होती. रोजगार, उद्योग व्यवसायावर लॉकडाऊनचा परिणाम होणार, हे खरे असले, तरी सध्याच्या काळात रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध व त्यांच्यावर उपचार गरजेचे आहेत. समाजात 90 टक्के लोक मास्क, सोशल डिस्टन्स, सिनिटायझेशन नियम पाळतात. पण 10 टक्के समाजकंटक नियम पाळत नाहीत व करोना पसरण्यास कारणीभूत होतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

नॅशनल हेल्थ मिशनकडे तक्रार : डॉ. विखे

नॅशनल हेल्थ मिशनकडून कोव्हिड उपचार सुविधांसाठी जिल्ह्याला आलेल्या 18 कोटी रुपयांच्या निधीतून होत असलेल्या कामांबाबत व खासदार म्हणून यात आपल्या सूचनांची दखल जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात नसल्याची तक्रार नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे dr.sujay vikhe patil यांनी नॅशनल हेल्थ मिशन व केंद्रीय आरोग्य मंत्रालय अंतर्गत असलेल्या आरोग्य समितीकडे केली आहे. स्वतः खा. डॉ. विखे यांनी ही माहिती दिली. मिशन व समितीकडे तक्रार केल्यानंतर तेथे झालेली चर्चा व निर्णयाबाबत गोपनीयता शपथ घेतल्याने मी त्यावर भाष्य करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.डॉ. विखे म्हणाले, प्रपंच चालवण्यासाठी मी खासदार झालो नाही. जनतेने ज्या हेतूने मला निवडून दिले, त्याला न्याय देऊ शकत नसल्याने हतबलता व्यक्त केली होती. जिल्हाधिकारी द्विवेदी व मी मित्र आहोत, आमच्यात संवादही आहे. डॉक्टर म्हणून माझ्याकडून सर्व जाणून घेतले जाते. पण होत काहीच नाही. त्यामुळे डॉ. सुजय म्हणतो, तसे करू नका म्हणून त्यांना कोणी फोन करते काय, याची शंका वाटते, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com