
मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपात (BJP) जाण्याचा चर्चांना उधाण आले आहे. अशातच खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक मोठा दावा केला आहे...
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एक स्फोट दिल्लीत होईल आणि दुसरा स्फोट महाराष्ट्रात होईल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. सुप्रिया सुळे यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगत आहेत.
अजित पवार (Ajit Pawar) भाजपमध्ये प्रवेश करणार का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे दादांना विचारा, मला गॉसिपसाठी वेळ नाही. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे खूप काम आहेत. त्यामुळे मला त्याची माहिती नाही. पण कष्ट करणारा नेता म्हणून सर्वांनाच अजित पवार आवडतात, म्हणूनच अशी विधाने केली जातात, असे त्यांनी नमूद केले.
अजित पवार कुठे आहेत? असा प्रश्न सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या की, माध्यमांनी अजित पवारांच्या मागे युनिट लावले आहे. राज्यात अनेक समस्या आहेत, राज्यात चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे, असे त्या म्हणाल्या.