अजित पवार गटाच्या खासदारांचे लवकर निलंबन करा; खासदार सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे पत्राद्वारे मागणी

अजित पवार गटाच्या खासदारांचे लवकर निलंबन करा; खासदार सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे पत्राद्वारे मागणी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

राष्ट्रवादी पक्षफुटीचा राज्यात सुरु असलेला (NCP Crisis) वाद आता लोकसभेतही पोहोचला आहे. प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी चार महिन्यांपूर्वी शरद पवारांनी राज्यसभेत केलेली असताना आता राष्ट्रवादीचे आणखी एक खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांचे निलंबन करण्याची मागणी सुप्रिया सुळे (Supriya Sule Demands To Take Action Against Sunil Tatkare) यांनी लोकसभाध्यक्षांकडे केली आहे. घटना आणि लोकशाही तत्वे टिकवून ठेवण्यासाठी वेळीच यावर निकाल दिला पाहिजे, असा मुद्दाही सुप्रिया सुळे यांनी पत्रात मांडला आहे.

पत्रात काय म्हंटल्या सुप्रिया सुळे?

खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्यासाठी आम्ही ४ जुलैला २०२३ रोजी याचिका दाखल केली होती. मात्र, चार महिने उलटून देखील यावर कोणतीही झाली नाही. दोषी खासदाराचे कृत्य हे दहाव्या अनुसूचीवरील निंदनीय हल्ला आहे.

अजित पवार गटाच्या खासदारांचे लवकर निलंबन करा; खासदार सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे पत्राद्वारे मागणी
बेडेकर मसाल्याचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन; वयाच्या ५६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पक्षाच्या या दोन खासदारांनी राष्ट्रवादी पक्षाची विचारसरणी बाजूला सारले आहे. स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी या नेत्यांनी पक्षविरोधी कारवाई केली आहे. तसेच राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या मतांना त्यांनी न जुमानता मतदारांचाही विश्वासघात केला आहे. त्यामुळे राज्यघटनेच्या १० व्या परिशिष्टानुसार, पक्षांतरबंदी कायद्यांच्या अंतर्गत या नेत्यांवर तात्काळ अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती.

घटना आणि लोकशाही तत्वे टिकवून ठेवण्यासाठी वेळीच यावर निकाल दिला पाहिजे, असा मुद्दाही सुप्रिया सुळे यांनी पत्रात मांडला आहे. सध्या आमदार अपात्रतेप्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.

अजित पवार गटाच्या खासदारांचे लवकर निलंबन करा; खासदार सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे पत्राद्वारे मागणी
Maratha Reservation: २ जानेवारी की २४ डिसेंबर? सरकारला दिलेल्या अल्टीमेटमबाबत जरांगेंचे स्पष्टीकरण

त्यातच आता सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या खासदारांना लवकरात लवकर अपात्र करा, अशी मागणी करणारे पत्र, लोकसभा अध्यक्षांना लिहले आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आता याबाबत काय निर्णय घेणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com