Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याताई दिल्लीत, दादा राज्यात... सुप्रिया सुळे होणार राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षा?

ताई दिल्लीत, दादा राज्यात… सुप्रिया सुळे होणार राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षा?

मुंबई | Mumbai

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद अचानक सोडल्यानंतर आता पुढचा अध्यक्ष कोण याची चर्चा सुरु झाली आहे. पण राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष पवार कुटुंबियांकडून थेट घोषीत केला जाणार नाही, तर यासाठी नेमलेली समिती याबाबत निर्णय घेणार आहे.

- Advertisement -

पण शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे याच पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील, यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे. आजच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर याची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरणार आहेत. तसेच राज्यातील एखाद्या राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला अध्यक्षाही ठरणार आहेत.

सुप्रिया, तू बोलू नकोस, मोठा भाऊ म्हणून सांगतोय!; अजित पवारांनी शरद पवारांसमोर दटावले

याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. आम्ही शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करू. शरद पवारांसारखा नेता भेटणं शक्य नाही. अगदीच काही झालं नाही तर या कमिटीला निर्णय घ्यावा लागेल. राज्यात अजित पवारांनी कार्यभार पाहावा आणि देशात सुप्रिया सुळे यांनी कारभार पाहावा. त्या संसदरत्न आहेत. उत्तम काम करू शकतात, असं छगन भुजबळ यांनी केलं.

दरम्यान काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची बैठक देखील रात्री उशिरापर्यंत सुरू होती. बैठकीनंतर अजित पवारांकडून सांगण्यात आले की शरद पवार दोन ते तीन दिवस विचार करून आपल्याला सांगणार आहेत. आपण या ठिकाणी गर्दी करू नये तसेच कोणत्या प्रकारचे आंदोलन देखील करू नये असे आवाहन अजित पवारांनी माध्यमासमोर केले होते. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी आपण उत्सुक नसल्याचेही अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. आपल्या मनात चुकूनही अध्यक्ष पदाचा विचार येत नसल्याचे पवारांनी म्हटले होते.

विराट कोहली अन् गौतम गंभीर यांच्यात मैदानातच राडा, बाचाबाचीचा Video तुफान व्हायरल

सुप्रिया सुळे यांची राजकीय कारकीर्द

२००६ ते २००९ मध्ये सुप्रिया सुळे यांनी राज्यसभा खासदार म्हणून काम केलं. २००९ ते २०१४, २०१४ ते २०१९ या दोन टर्म त्या लोकसभेवर खासदार राहिलेल्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या असून बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत.

काय म्हटलं होतं पवारांनी?

मंगळवारी मुंबईत शरद पवार यांच्या लोक माझे सांगती या पुस्ककाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. माझ्या खासदारकीचे तीन वर्ष राहिली आहेत, आता आणखी नवी जबाबदारी नको म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नव्या अध्यक्षांची निवड ही पक्षाच्या ज्येष्ठांच्या सल्ल्यानं व्हावी असंही पवार म्हणाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या