“जेव्हा टीव्ही बघते तेव्हा मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री ...”; सुप्रिया सुळेंची खोचक टीका

“जेव्हा टीव्ही बघते तेव्हा मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री ...”; सुप्रिया सुळेंची खोचक टीका

मुंबई | Mumbai

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह सुरू आहे. सर्वसामान्यांपासून ते राजकीय दिग्गजांपर्यंत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सण साजरा करत आहे.

गणेशोत्सवा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि भाजपचे इतर राजकीय नेते एकमेकांच्या घरी भेटी देत आहेत. या भेटींवर बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केली आहे.

"ज्या उत्साहाने आमचं सरकार पाडलं त्या उत्साहाने कामे होत नाहीत,अडीच महिन्यात काही काम होताना दिसत नाहीत. गाठीभेटी आणि होम व्हिजिट सोडून या सरकारच्या फारश्या काही बातम्या दिसत नाहीत. जे दौरे दिसतात ते एक किलोमीटरच्या आतले असतात. मी जेव्हा जेव्हा टीव्ही बघते तेव्हा मला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नेहमीच कुणाच्या तरी घरीच दिसतात," असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

तसेच "50 खोके ऑल ओके वाल्या सरकारला सर्वसामान्यांची सेवा करण्याची इच्छा नव्हती. सध्या सरकारमधील लोक कार्यक्रमांना भेटी देणं सोडतील तर जनतेची सेवा करतील ना… हे एवढे सेलिब्रेशन करण्यात एवढे व्यस्त आहेत की बस्ता बांधला त्यानंतर लग्न केले. मात्र लग्नाचा अजूनही हनिमून सुरु आहे. तसेच 50 खोके ऑल ओके, सर्वसामान्य माणूस मात्र नॉट ओके." असे सुळे म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com