भुजबळांची कबुली, शरद पवारांवरील 'ते' आरोप ठरले खोटे; नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

भुजबळांची कबुली, शरद पवारांवरील 'ते' आरोप ठरले खोटे; नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

पुणे | Pune

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची मुलाखत एका वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झाली. यात भुजबळ यांनी पहाटेचा शपथविधी आणि आता झालेला 2 जूनचा शपथविधी शरद पवारांना अंधारात ठेवून घेतलेले आहेत, अशी त्यांनी स्वत:च कबुली दिली. शरद पवार यांना अंधारात ठेऊन शपथ घेतली गेली. हे कालच्या मुलाखतीतून समोर आले आहे, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे...

छगन भुजबळ यांच्या मुलाखतीत त्यांनी 2019 आणि 2023 च्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयावर भाष्य केले आहे. 2019 मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती. मंत्रिपदापासून खाते वाटपापर्यंतची सगळ्यावर बोलणी झाली होती.

भुजबळांची कबुली, शरद पवारांवरील 'ते' आरोप ठरले खोटे; नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
Train Accident News : बिहारमध्ये नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले; ४ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

शिवसेनेला वगळून सरकार बनवण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी भाजपने शरद पवार यांना विचारले आमच्यासोबत नक्की राहणार का? तेव्हा शरद पवार यांनी त्यांना होकार दिला होता. पण नंतर पवारांनी माघार घेतली. पण अजितदादांनी शब्द दिला होता. त्यांनी तो शब्द पाळला. म्हणून ते भाजपसोबत गेले. त्यांनी पहाटेची शपथ घेतली, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी छगन भुजबळांचे सगळे दावे फेटाळले आहेत. आम्ही आमची विचारधारा सोडणार नाही. काँग्रेसच्या विचारधारेशी प्रतारणा करणार नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शरद पवार हे अध्यक्ष असताना अजित पवारांनी परस्पर हे निर्णय घेतले होते हे स्पष्ट झाले आहे. छगन भुजबळ यांच्या वक्तव्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. शरद पवारांनी कधीही आपली विचारधारा सोडलेली नाही. त्यांना कधीच भाजपसोबत जायचे नव्हते. त्यांनी काँग्रेसची विचारधारा कधीही सोडली नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

भुजबळांची कबुली, शरद पवारांवरील 'ते' आरोप ठरले खोटे; नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
Sushma Andhare : "ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी दादा भुसेंचा फोन"; ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com