Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या'अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन', सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

‘अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन’, सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

मुंबई | Mumbai

अभिनेता अभिताब बच्चन सगळ्याच चित्रपटात चालतो. मग राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राजकारणातील अभिताब बच्चन आहेत. असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. आज मुंबई येथील पक्षाच्या कार्यालयात सुप्रिया सुळे यांंचं कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच स्वागत करण्यात आलं. त्यावेळी त्या बोलत होत्या.

- Advertisement -

अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये यावं, असं मंत्री दिपक केसरकर यांनी म्हटलं. त्या प्रश्नावर उत्तर देतांना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. अभिताब बच्चन आपल्या देशातील सगळ्याच चित्रपट दिग्दर्शकांना आपल्या चित्रपटात घ्यावं असं वाटतं. तसंच राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनाही घ्यावासं वाटतं. त्यामुळे अजित पवार राजकारणातील अभिताब बच्चन आहेत. असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

इंदुरीकर महाराज गोत्यात! ‘त्या’ विधानावरून न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश, अडचणी वाढल्या

दरम्यान, मुंबईत लोकलमध्ये झालेल्या महिला अत्याचारावरुन सुप्रिया सुळेंनी शिंदे सरकारवर टीका केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, सरकार महिलांबाबत असंवेदनशील आहे. मुंबईत महिला सुरक्षेच प्रश्न गंभीर आहे. राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. महिला सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी गृहखात्याची आहे. मात्र, ते सपशेल अपयशी ठरले आहेत.

गेले दोन दिवस राज्यात जाहिरातीवरुन युतीत चांगलाच वाद रंगला आहे. यावर भाष्य करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यातील सत्ताधारी पक्ष जाहीरातींवर पैसा खर्च करण्यात व्यस्त आहे. सेनेचा जाहिरात वाद दुर्दैवी आहे. सत्ताधारी पक्ष आपापसात वाद घालत आहेत. वृत्तपत्रांमध्ये अशी जाहिरात देण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतात. अशी जाहिरात देणारे हितचिंतक आम्हीही शोधत आहोत.

Manipur Violence : मणिपूर धगधगतंच! केंद्रीय मंत्र्यांचं घर जाळलं, सुरक्षारक्षक बघत राहिले, कारण…

दीपक केसरकर काय म्हणाले होते?

केसरकर म्हणाले, दादा हे कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्या कामाचा फायदा हा राज्यातील जनतेला झाला पाहिजे. राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यासोबत काय होतंय हे सर्वांना माहित आहे. दादा विरोधी पक्षाचे नेते, जबाबदार नेते आहेत. सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये दादा आमच्याबरोबर आघाडीवर असतील याची मला खात्री आहे. संजय राऊत यांच्यासारखे लोक रोज बोलतात त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. मात्र दादा जेव्हा बोलतात ते जनता त्याला गांभीर्याने घेते. अजित पवार कार्यक्षम नेते असून त्यांनी आमच्यासोबत यावं. अशी खुली ऑफर केसरकर यांनी अजित पवार यांना दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या