Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या“महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून…”; सत्तारांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

“महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून…”; सत्तारांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली होती. यावरून राज्यभरात राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र आहे. अशातच आता या वादावर स्वतः सुप्रिया सुळे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात.

मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया.

याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा ‘सुसंस्कृतच महाराष्ट्र’ आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद-जय महाराष्ट्र !

महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या