Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या“उद्योग-रोजगार पळवल्यावर आता ज्योतिर्लिंग...”; भीमाशंकर वादावरून सुप्रिया सुळे आक्रमक

“उद्योग-रोजगार पळवल्यावर आता ज्योतिर्लिंग…”; भीमाशंकर वादावरून सुप्रिया सुळे आक्रमक

मुंबई | Mumbai

भीमाशंकरचे ज्योर्तिलींग (Bhimashankar Sixth Jyotirlinga) हे खरे नसून आसाममधील ज्योतिर्लिंग खरे आहे, असा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी केला आहे. एवढंच नाही तर आसाम पर्यटन विभागानं (Assam Tourism Department Office) यासंदर्भात जाहिरातबाजी देखील केली आहे. यामुळे आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

ज्योतिर्लिंगाच्या या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. ‘भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळविले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय….!’, असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये सुप्रिया सुळे यांनी या जाहिरातीचा फोटोही शेअर केला आहे.

‘घटनाबाह्य ED सरकार-आपण गुवाहाटीला आमदारांची फौज पळवून नेली होती.तिथं तुमची सर्व सोय अदृश्य शक्तीच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती.त्याचवेळी तुम्ही बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना?अर्थात अशी शक्यता नाकारता येत नाही’, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

‘श्रीमद् आद्य शंकराचार्य आपल्या बृहद रत्नाकर स्तोत्रामध्ये स्पष्टपणे म्हणतात की, भीमा नदीचा उगम आणि डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे, अन्य कोणतेही नाही.आता आणखी कुणाची साक्ष हवी ?’, असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना नम्र विनंती आहे की, कृपया महाराष्ट्राचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा जपण्यासाठी याची तातडीने दखल घ्यावी.या विषयाबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती कळवून आपली हरकत नोंदवावी’, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे (Congress) नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी देखील भाजपवार या मुद्द्यावरून आगपाखड केली आहे. सावंत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “केवळ उद्योगच नव्हे तर आता भाजपाला महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे आहे. आता भाजपाच्या आसाम सरकारचा दावा आहे की भीमाशंकर येथील सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये आहे. या अत्यंत आगाऊपणाच्या दाव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.”

काय आहे त्या जाहिराती?

आसाममध्ये असलेले भाजप सरकारचे मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिसवा सरमा यांनी एका जाहिरातीमध्ये आसाममध्ये महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. पण या जाहिरातीमध्ये त्यांनी आसाम राज्यात असलेल्या डाकिनी टेकडीच्या कुशीत वसलेल्या पमोही गुवाहाटी येथील शिवलिंग हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या