सुप्रिया गावितांची कोळदे गटातून होणार राजकीय एन्ट्री ?

सुप्रिया गावितांची कोळदे गटातून होणार राजकीय एन्ट्री ?

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी अद्याप एकही पक्षातील उमेदवार निश्चित झालेले नसताना कोळदे ता.नंदुरबार गटातून आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या द्वितीय कन्या तथा खा.डॉ.हीना गावित यांच्या लहान भगिनी डॉ.सुप्रिया गावित या कोळदे ता.नंदुरबार या जि.प. गटातून उमेदवारी करून 'राजकीय एन्ट्री' घेणार आहेत. भाजपातर्फे इच्छुक उमेदवाराच्या आज मुलाखती घेण्यात आल्या. त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 11 गटांचा पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवसापर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक असून काहींचे राजकीय पुनर्वसन तर काहींचा राजकीय बळी जाणार आहे.

कोळदे ता.नंदुरबार या गटात भाजपाच्या योगिनी अमोल भारती या निवडून आल्या होत्या. मात्र, पोटनिवडणुकीत त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता असून त्यांच्या जागी आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या द्वितीय कन्या तथा खा.डॉ. हीना गावित यांच्या भगिनी डॉ.सुप्रिया गावित यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डॉ.सुप्रिया राजकीय एन्ट्री घेणार आहेत.

त्यामुळे योगिनी अमोल भारती यांना डच्चू मिळणार की त्यांचे दुसऱ्या गटातून राजकीय पुनर्वसन होणार? याबाबत देखील चर्चा सुुरु आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com