
दिल्ली | Delhi
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाला दिले. बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले.
मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून काल सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या बुधवारी सुनावणी होणार आहे. आता यावर न्यायालय काय निर्णय घेणार, याची उत्सुकता लागली आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयात याचिका मेंशन करत असतांना कपिल सिब्बल यांनी शिवसेनेचे बँक अकाऊंट आणि फंड जाईल अशी भीती व्यक्त केली आहे. याशिवाय जो पर्यन्त सुनावणी होत नाही किंवा स्थगिती दिली जात नाही तोपर्यंत हे प्रकरण जसे आहे तसेच ठेवण्याची मागणी केली होती.
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी यावेळी ही सुनावणी लवकरात लवकर घेण्यात यावी किंवा तोपर्यंत कुठलाही निर्णय होऊ नये अशी मागणी केली होती, मात्र यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या वतिने सत्तासंघर्षाची सुनावणी झाल्यावर निर्णय घेऊ असे म्हंटले आहे.