Friday, April 26, 2024
Homeराजकीयप्रताप सरनाईकांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

प्रताप सरनाईकांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

मुंबई | Mumbai

ईडीच्या रडारवर असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना १० डिसेंबरपूर्वी चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहायचं होतं. मात्र, त्यांच्यावर ईडीकडून अटक होण्याची टांगती तलवार होती. दरम्यान, आज प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाच्या दिलाशामुळे प्रताप सरनाईक यांची अटक टळली आहे. टॉप सिक्योरिटी एमएमआरडीए आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय पथकाने प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग सरनाईक याच्या घरावर चौकशीसाठी छापा टाकला होता. ईडीने ही कारावई २४ नोव्हेंबर २०२० या दिवशी केली होती.

विहंग सरनाईक यांची ईडीने पाच तास चौकशी केली. त्यानंतर ईडीने प्रताप सरनाईक यांनाही नोटीस पाठवली आणि चौकशीसाठी बोलावणे धाडले. परंतू, प्रताप सरनाईक हे चौकशीसाठी गेले नाहीत. दरम्यान, सरनाईक यांनी ईडीच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने सरनाईक यांना दिलासा देत प्रताप सरनाईक कुटुंबीयांवर कोणताही कारवाई करु नये असे आदेश दिले आहेत. न्यायालयाने याच आदेशात सरनाईक यांना चौकशीसाठी मात्र बोलवता येऊ शकते मात्र त्यांना अटक करता येणार नसल्याचे म्हटले आहे.

प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिरात सहकुटुंब जाऊन दर्शन घेतले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलाताना देशावरील कृषी काद्याचे आणि सरनाईक कुटुंबीयांवरील इडीचे इडापीडा टळो असे गाऱ्हाणे आपण श्री सिद्धीविनायक चरणी घातल्याचे सांगितले. दरम्यान, न्यायालयाच्या रुपात सरनाईक यांना आज बाप्पाच पावला अशी चर्चा सुरु झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या