Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

 देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रातील आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणावर येत्या १ ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीवर समाधान व्यक्त केलं आहे. 'सुप्रीम कोर्टासमोर दोन्ही बाजूंनी आपापलं म्हणणं सविस्तर मांडलं आहे. यासंदर्भात संविधान पीठाचा विषय आहे, तो संविधान पीठासमोर जाणं गरजेचं आहे असं आमची बाजू मांडणारे वकील हरीश साळवे यांनी न्यायालयात सांगितलं आहे,' असं फडणवीस म्हणाले.

तसेच आज सुनावणीत आमदारांच्या पात्रतेबाबत 'जैसे थे स्थिती' ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यावरुन शिंदे गटातील आमदारांना दिलासा मिळाल्याची चर्चा करण्यात येत आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, 'कोर्टाने फक्त शिंदे गट व शिवसेनेने ज्या नोटीसा आमदारांना पाठवल्या आहेत, त्यावर 'जैसे थे'चे आदेश दिले आहेत. म्हणजेच पुढील आदेशापर्यंत आमदारांवर कोणतीही कारवाई करु नका, असे दोन्ही बाजूंना सांगितले आहे. याचा चुकीचा अर्थ लावू नये.'

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com