Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यासुखविंदर सिंग सुखू हिमाचलचे नवे मुख्यमंत्री, मुकेश अग्निहोत्री उपमुख्यमंत्री

सुखविंदर सिंग सुखू हिमाचलचे नवे मुख्यमंत्री, मुकेश अग्निहोत्री उपमुख्यमंत्री

दिल्ली | Delhi

कॉंग्रेस नेते सुखविंदर सिंग सुखू यांनी हिमाचल प्रदेशचे १५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शिमला येथील रिज मैदानावर हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी सखू यांना मंत्रिपदाची शपथ दिली.

- Advertisement -

सुखू यांच्यासोबत काँग्रेस नेते आणि प्रतिभा सिंह यांचे निकटवर्तीय मुकेश अग्निहोत्री यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते सखु यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

हिमाचल विधानसभा निवडणुकीत एकूण ६८ जागांपैकी ४० जागा जिंकून काँग्रेसने भाजपला सत्तेतून हद्दपार केले. दरम्यान, सिमला येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुखू यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती.

चार वेळा आमदार राहिलेले, सुखू हे बस ड्रायव्हरचे सुपूत्र आहेत. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला शिमला येथील हिमाचल प्रदेश विद्यापीठाच्या कॅम्पसमधून सुरुवात केली. काँग्रेस निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख असलेले ५८ वर्षीय सुखविंदर सुखू हिमाचल प्रदेशातून मुख्यमंत्री झाले आहेत. प्रेमकुमार धुमल यांच्यानंतर हमीरपूर जिल्ह्यातील मुख्यमंत्रीपद भूषवणारे ते दुसरे नेते आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या