Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामराठा, ओबीसी समाजाची दिशाभूल थांबवा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन

मराठा, ओबीसी समाजाची दिशाभूल थांबवा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन

मुंबई | प्रतिनिधी

राज्यात सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ट्रिपल इंजिन सरकारची आरक्षणप्रश्नी स्पष्ट भूमिका नसल्याने हा गुंता वाढत चालला आहे. समाजा-समाजात संशय वाढत चालला आहे. राज्य सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावरून एकवाक्यता नाही. सरकारमधील मंत्री बोलतात एक व तर दुसरीकडे जाहिरात देऊन वेगळाच संदेश देत आहेत. ही गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्यास ट्रिपल इंजिन सरकारच जबाबदार असून राज्य सरकारने याप्रश्नी ठोस भूमिका मांडून मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल थांबवावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केले.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी बोलताना पटोले यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अ‍ॅक्शन मोडवर; शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी समोर आली ‘ही’ महत्वाची माहिती

मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगत आहेत. मग मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून त्यांना कोणी रोखले आहे का? १० वर्ष होत आली केंद्रात भाजपचे सरकार आहे. मग आजपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय का घेतला नाही? मागच्याच महिन्यात संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले होते.

या विशेष अधिवेशनात ५० टक्के मर्यादा काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असता तर हा प्रश्न निकाली निघाला असता. आता मोदी सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. डिसेंबर महिन्यात संसदेचे शेवटचे अधिवेशन होईल त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते, असे पटोले म्हणाले.

पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; एस.पी.सिंह दिव्यांग कल्याण आयुक्तपदी

एकाचे आरक्षण काढून दुसऱ्याला देणे हे चुकीचे आहे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेली आहे ती योग्यच आहे. पण राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय करतात ते कळतच नाही आणि दुसरे उपमुख्यमंत्री वेगळेच बोलतात.

हे सर्व थांबवून ठोस भूमिका मांडली पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर जातनिहाय जनगणना करावी आणि आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवावी, या राहुल गांधी यांच्या मागणीला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन पटोले यांनी केले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या