
मुंबई | Mumbai
महाविकास आघाडीचे (Mahavikas Agahdi) सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेत्यांसोबत महत्वपूर्ण बैठक घेतली आहे...
या बैठकीत शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, जर सरकार (Government) पडले तर संघर्षाची तयारी ठेवा, असे विधान त्यांनी केली आहे.
तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सांगितले आहे की, महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) तुमच्याशी पाठीशी आहे. मात्र तुम्ही आता कणखर भूमिका घ्यायला हवी आणि पुढील काळात निर्णय घ्यावे.
आज सायंकाळी पाच वाजता शरद पवार (Sharad Pawar) हे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि खासदारांसोबत थेट संवाद साधणार आहेत. या संवादात शरद पवार काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.