Goa Election : ...म्हणून शिवसेना अन् काँग्रेसची युती होऊ शकली नाही; संजय राऊतांचे स्पष्टीकरण

Goa Election : ...म्हणून शिवसेना अन् काँग्रेसची  युती होऊ शकली नाही; संजय राऊतांचे स्पष्टीकरण

मुंबई | Mumbai

गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) शिवसेनेने (Shivsena) काँग्रेससोबत (Congress) युती करण्याचा कसोशीने प्रयत्न केला गेला मात्र यात शिवसेनेला यश आले नसल्याचे दिसत आहे...

आता गोव्यातील सत्ताधारी भाजपला (BJP) आव्हान देण्यासाठी शिवसेनेच्या सोबत कोणीच आले नाही तर स्वबळाची देखील तयारी दर्शवली आहे. असे विधान शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्यावेळी ते बोलत होते. फोडा-झोडा व राज्य करा ही भाजपाची गोव्यातील नीती आहे असा आरोप करत, भाजपाला (BJP) बहुमत मिळणार नसल्याचे देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

ते म्हणाले की, काँग्रेसबरोबर आमची काही काळ चर्चा नक्कीच झाली. पण गोव्यातील (Goa) काँग्रेस जरा वेगळ्याच लाटेवर तरंगते आहे. पण ठीक आहे त्यांना तरंगू द्या, तडाखे बसतात मग. शिवसेना (Shivsena) स्वतंत्रपणे लढेल आणि शिवसेना इथे पहिल्यांदा निवडणूक लढत नाही. प्रत्येक निवडणुकीतून (Election) शिवसेना इथे वाढतच गेली आहे. कधीकाळी भाजपदेखील येथे १२-१३ जागांवर लढला होता. तेव्हा त्यांच्या सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते.

हे निवडणुकांमध्ये सुरूवातीच्या काळात होतच असते. भाजपाचे एकदा लोकसभेत ३६० उमेदवारांचे डिपॉझिट गेले. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) बहुसंख्य लोकांचे डिपॉझिट (Deposit) गेले आहे, म्हणून लढायचे नाही का? पण आता गोव्यात शिवसेना रूजते आणि रूजली आहे.

भाजप नेहमी बहुमताच्या आसपास येऊन थांबलेले आहेत आणि मग याचे-त्याचे विकत घे, याचे त्याचे आमदार फोड, फोडा-झोडा व राज्य करा ही भाजपची गोव्यातील नीती आहे. त्यामुळे आम्हाला कसलीही चिंता नाही. असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com