ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालतोय का? नवाब मालिकांचा हल्लाबोल

ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालतोय का? नवाब मालिकांचा हल्लाबोल
मंत्री नवाब मलिक

मुंबई | Mumbai

गुजरातमधील ड्रग्ज प्रकरणावरून (Gujrat Drugs CaSE) आता राजकीय वर्तुळात चांगलेच वातावरण तापू लागले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थोड्यावेळापूर्वीच या प्रकरणावरून एनसीबी (NCB) टोला लगावला...

आता राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी याप्रकरणावरून भाजपावर (BJP) निशाणा साधला. ड्रग्जचा खेळ हा गुजरातमधून चालतोय का? असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मलिक बोलत होते. द्वारकामधून ३५० कोटींचे ड्रग्ज सापडल्याने आता गुजरात ड्रग्ज रॅकेटचे केंद्र बनू लागलंय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरून नवाब मलिक यांनी गुजरात सरकारमधील एका मंत्र्याचेदेखील नाव घेतले.

मंत्री नवाब मलिक
३५० किलो ड्रग्जचा अभ्यास करा; संजय राऊतांचा एनसीबीला टोला

द्वारकामध्ये ३५० कोटींचं ड्रग्ज पकडले गेले. मनीष भानुशाली, धवल भानुशाली, किरण गोसावी, सुनील पाटील हे सगळे लोक वारंवार अहमदाबादमध्ये नोवाटल आणि फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये राहिले. गुजरातचे मंत्री किरीटसिंह राणा यांच्याशी या सगळ्यांचे जवळचे संबंध आहेत. हे सारे ड्रग्जच्या खेळाचे खेळाडू आहेत. ड्रग्जचा खेळ गुजरातहून तर नाही ना? असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

मंत्री नवाब मलिक
गुजरातमधून ३५० किलो ड्रग्ज जप्त; महाराष्ट्र कनेक्शन?

महाराष्ट्रात दोन ग्राम ड्रग्ज पकडल्यास बॉलिवूडकरांची परेड होते. मात्र गुजरातमध्ये समृद्रातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी योग्य दिशेने व्हावी. यात कोणत्या पक्षाचा नेता आणि कार्यकर्ता आहे. याकडे दुर्लक्ष करून एनसीबी आणि एनआयएने चौकशी करावी. या ड्रग्जचे खेळाडू गुजरातमध्ये आहेत. त्यामुळे त्याची चौकशी करावी. गुजरात कनेक्शन काय आहे ते समोर यावे, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com