Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यावाघाची मांजर कधी झाली कळलंच नाही?; नारायण राणेंचा घणाघात

वाघाची मांजर कधी झाली कळलंच नाही?; नारायण राणेंचा घणाघात

कणकवली | kankavli

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे पाहत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane Ra) ‘म्याव म्याव’ असा मांजरीचा आवाज काढला. यावरुन राजकीय वातावरण तापू लागले आहे. या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे…

- Advertisement -

नितेशने विधिमंडळात म्याव म्याव केलेले नाही. तो काही असंसदीय शब्द नाही. आदित्य ठाकरेंचा आणि मांजराचा काही संबंध आहे का? वाघाची मांजर कधी झाली? मांजरीचा आवाज काढला म्हणून राग का यावा? असा सवाल नारायण राणेंनी केला. कणकवली येथे नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

‘ते’ हल्लेखोर शिवसेनेचेच; रोहिणी खडसेंचा दावा

नारायण राणे म्हणाले की, नितेशने विधिमंडळात म्याव म्याव केलेले नाही. तो काही असंसदीय शब्द नाही. मग तुमची काय हरकत आहे. मांजराचा आवाज कोण काढतं की ज्यामुळे संताप झाला? आदित्य ठाकरेंचा आणि मांजराचा काही संबंध आहे का? वाघाची मांजर कधी झाली? त्याच वेळी कुणी अजून कसला आवाज काढला असता, तर ते तसेच आहेत का? मांजरीचा आवाज काढला म्हणून राग का यावा? असा सवाल करत मी अन्याय सहन करणाऱ्यातला नाही. विधिमंडळात सगळ्याच चांगले काम नितेशचे आहे, असं कौतुक राणे यांनी केले.

पेपरफुटीमागे न्यासाच : पोलीस आयुक्त

कोण अजित पवार?

अजित पवारांनी विधानसभेत मांडलेल्या भूमिकेविषयी नारायण राणेंना विचारले असता ‘कोण अजित पवार? मी ओळखत नाही. राज्यातल्या लोकांच्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे, त्यांच्याबाबत संदर्भ का देत नाहीत तुम्ही?” असा उलट प्रश्न त्यांनी अजित पवारांना विचारला.

- Advertisment -

ताज्या बातम्या