३५० किलो ड्रग्जचा अभ्यास करा; संजय राऊतांचा एनसीबीला टोला

३५० किलो ड्रग्जचा अभ्यास करा; संजय राऊतांचा एनसीबीला टोला

मुंबई | Mumbai

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरुन (Mumbai Cruise Drugs Case) राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीदेखील एनसीबीला टोला लगावला आहे...

गुजरातमध्ये ३५० किलो ड्रग्ज आढळून आल्याची बातमी समोर आली आहे. गुजरातमधील द्वारका (Dwarka) भागातून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले. याकडेदेखील एनसीबीने (NCB) लक्ष द्यावे असे राऊत यांनी म्हटले आहे. राऊत म्हणाले की, द्वारकामध्ये ड्रग्ज सापडणे ही चिंताजनक बाब आहे.

महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना ज्यांनी पाव ग्रॅम ड्रग पकडून जागतिक ख्याती प्राप्त केली. त्यांनी या ३५० किलो ड्रग्जचा अभ्यास करावा. याआधीदेखील गुजरातमध्ये साडेतीन हजार किलो ड्रग्ज सापडले होते. आता गुजरातमध्ये साडेतीनशे किलो ड्रग्ज सापडले.

आता त्यात गुजरातमधील सिनेसृष्टी, काही श्रीमंतांची मुले अडकली असतील त्या लोकांनी पाहावे आता. एनसीबीचे पथक गुजरातमध्ये काय काम करत आहे, हे देखील देशाला देशाला कळाले पाहिजे, असे राऊत म्हणाले.

३५० किलो ड्रग्जचा अभ्यास करा; संजय राऊतांचा एनसीबीला टोला
गुजरातमधून ३५० किलो ड्रग्ज जप्त; महाराष्ट्र कनेक्शन?

दरम्यान, गुजरातच्या (gujrat) द्वारकामध्ये (dwarka) तब्बल ३५० किलो ड्रग्ज (drugs) जप्त येऊन एका व्यक्तीला अटक (arrested) करण्यात आली आहे. त्या व्यक्तीकडे १७ किलो मेफेड्रोन आणि हेरोईन सापडले आहेत. हा आरोपी महाराष्ट्रातील (maharashtra) मुंब्र्याचा (mumbra) रहिवाशी असून तो भाजीविक्रेता आहे.

देवभूमी द्वारका पोलिसांनी (Police) ही करवाई केली आहे. आरोपीकडे सापडलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे ८८ कोटी २५ लाख रुपये आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १९ पाकिटे हस्तगत केली आहेत. याशिवाय आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४७ पाकिटे जप्त करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com