'हा' तर कायदेशीर अपराध; सिंधुदुर्ग पोलिसांवर फडणवीस संतापले

'हा' तर कायदेशीर अपराध; सिंधुदुर्ग पोलिसांवर फडणवीस संतापले

मुंबई | Mumbai

सिंधुदुर्ग पोलिसांनी (Sindhudurg Police) कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसते. सीआरपीसी १६० ची नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक हे विसरले की ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये (Police Station) साक्षीसाठी बोलवितच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते...

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर अपराध आहे. त्यामुळे आता त्या पोलीस अधिकाऱ्यांवर आयपीसी १६६ अ अंतर्गत एफआयआर नोंदविला जावा, अशी मागणी आहे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्वीटद्वारे केली आहे.

असे न केल्यास भाजपा CRPC 156(3) अंतर्गत खटला दाखल करेल. तसेच हे जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने केले असेल तर त्यांच्यावर सुद्धा IPC 34 अन्वये सहआरोपी बनविण्याची मागणी भाजप (BJP) करेल, असेदेखील फडणवीस म्हणाले.

नितेश राणे (Nitesh Rane) कुठे आहेत, असा सवाल विचारल्यावर हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असे उत्तर नारायण राणेंनी दिले होते. याबाबत पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली. मात्र कामात व्यग्र असल्याचे सांगून राणे यांनी हजेरी लावली नाही. या प्रकरणावरून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग पोलिसांना सुनावले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com