Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाना पटोले तर ‘मिस्टर नटवरलाल’च्या भूमिकेत; बावनकुळेंचा घणाघात

नाना पटोले तर ‘मिस्टर नटवरलाल’च्या भूमिकेत; बावनकुळेंचा घणाघात

नागपूर | Nagpur

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) मी मोदींना मारू शकतो असे वादग्रस्त विधान केले आहे. यावरून भाजप नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येते. भाजपकडून सातत्याने नाना पटोलेंच्या अटकेची मागणी केली आहे…

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे सध्या ‘मिस्टर नटवरलाल’च्या भूमिकेत आहेत. नाना पटोले हे खोटे बोलण्याचा काम करतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबाबत बोलून गावातील गाव गुंडाबद्दल बोलल्याचे सांगत ते खोटं बोलत असल्याची टीका भाजप (BJP) आमदार चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी केली आहे…

Visual Story : अबब! ‘पुष्पा’च्या आयटम साँगसाठी समांथाने आकारले पाच कोटी

तसेच पटोले काँग्रेसची (Congress) प्रतिमा घालवत आहेत. सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची प्रतिमा यांच्यामुळे जाण्याची वेळ आली असल्याचेदेखील ते म्हणाले आहेत.

Visual Story : ‘या’ भारतीय क्रिकेटपटूनं वाढदिवशीच उरकला साखरपुडा; फोटोज व्हायरल

ते पुढे म्हणाले की, मी त्यांच्याविरोधात आंदोलन (Agitation) केले. तेथे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे वक्तव्य केले तिथे चारशे लोकांची उपस्थिती होती.

Photo Gallery : आता नाशिकमध्ये घेता येईल केदारनाथचे दर्शन

आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर मी याविरोधात कोर्टात जाऊन गुन्हा दाखल झाला पाहिजे, यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे. गुन्हा दाखल झाल्या शिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. तसेच पटोले यांना महात्मा गांधींवर प्रेम असेल तर सत्तेतून बाहेर पडा. असेदेखील त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या