चंद्रकांत पाटलांना 'ते' वक्तव्य भोवले; महिला आयोगाने धाडली नोटीस

चंद्रकांत पाटलांना 'ते' वक्तव्य भोवले; महिला आयोगाने धाडली नोटीस

मुंबई । Mumbai

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP State President Chandrakant Patil) यांना राज्य महिला आयोगाने (State Women's Commission) नोटीस बजावली असून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत (offensive statement) दोन दिवसांत लेखी खुलासा करण्याचे निर्देश आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिले आहेत...

भाजपच्या ओबीसी (OBC) आंदोलनावेळी (Agitation) माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर अत्यंत शेलक्या भाषेत टीका केली होती.

"तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. खासदार असून तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाही तर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या", असे ते म्हणाले होते. चंद्रकांत पाटलांच्या या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल पुणे शहर लीगल सेलचे असीम सरोदे (Asim Sarode) आणि सहकाऱ्यांनी महिला आयोगाकडे तक्रार अर्ज केला होता. त्या आधारे महिला आयोगाने पाटील यांना नोटीस बजावली आहे.

चंद्रकांत पाटलांना 'ते' वक्तव्य भोवले; महिला आयोगाने धाडली नोटीस
अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे नाव बदलले

महिला आयोगाने या पत्रात म्हटले आहे की, आज महिला स्वकर्तुत्वावर शिक्षण, व्यवसाय, समाजकारण व राजकारणासह सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य समस्त महिला वर्गाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविणारे आहे. एका लोकप्रतिनिधीकडून असे वक्तव्य होणे ही खेदाची बाब आहे.

यापुढे महिलांचा सन्मान राखला जाईल याचे भान चंद्रकांत पाटील यांनी राखावे. तसेच, केलेल्या वक्तव्याबाबत लेखी खुलासा सादर करावा असे निर्देश राज्य महिला आयोगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना दिले आहेत.

चंद्रकांत पाटलांना 'ते' वक्तव्य भोवले; महिला आयोगाने धाडली नोटीस
खुशखबर! सात हजार जागांसाठी 'या' तारखेपासून होणार पोलीस भरती

दरम्यान, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) आमचे सरकार दडपशाहीचे नाही. मी इतका काही त्याचा विचार करत नाही, त्यांना वाटले म्हणून ते बोलले असेल, असे म्हटले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com