प्रदेशाध्यक्ष पटोले जिल्हा काँग्रेसला देणार संजीवनी

jalgaon-digital
3 Min Read

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

देशात शेतकरीविरोधी तीन काळे कायदे रद्द व्हावे, यासाठी शेतकरी-कामगारांमध्ये जनजागृती करुन नवचैन्याची मशाल पेटविण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांचा 23 रोजी जिल्हा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे.

तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ मिळण्यासाठी राज्यभरात बैठका घेऊन मार्गदर्शन करणार आहे.

फैजपूरला काँग्रेसला एक इतिहास लाभलेला आहे. म्हणून त्याची सुरुवात प्रथम फैजपूर येथून आमदार पटोले करणार असल्याची माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी मंगळवारी काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, डी.जी.पाटील, जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, श्याम तायडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार चौधरी पुढे म्हणाले की, केंद्र शासनाने शेतकरी, कष्टकरी कामगार हिताविरोधी जे निर्णय घेतले आहे. गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून विविध शेतकरी संघटना दिल्लीत आंदोलन करीत आहे.

शेतकर्‍यांना परावलंबी करण्याचे केंद सरकारचे धोरण आहे,अशी टीका करीत त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यभर जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. फैजपूर येथूनच त्याची पहिली सुरुवात करुन शेतकरीविरोधी तीन काळे कायद्याची होळी करण्यात येणार आहे.

तसेच शेतकर्‍यांना जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे. आता जिल्ह्यातही काँग्रेसमधील गटतट विसरुन कामाला लागलो आहोत. जिल्ह्यात काँग्रेसचे पुढील चित्र वेगळे असणार असून जिल्ह्यात काँग्रेसला उज्जवल भविष्य लाभणार आहे. जिल्हयातच नव्हे महाराष्ट्रात काँग्रेस नंबर एक राहिल,असा दावाही आमदार चौधरी यांनी केला.

शेतकर्‍यांचे मनोबल वाढविणार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा 23 रोजी जिल्हा दौरा हा शेतकर्‍यांचे मनोबल वाढविणारा असून शेतकर्‍यांना फर्टीलायझर यासह विविध शेती साहित्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. आमदार पटोले यांना शेतकर्‍यांची जाण असून कोरोनाच्या कार्यकाळात सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली गावागावत काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी इतर पक्षांपेक्षा मोठ्या प्रमाणात काम केले आहे.

अशा निवडक काँग्रेस कार्यकर्त्यांचा आमदार पटोले यांच्याहस्ते सत्कार करण्यात येणार आहे. आमदार पटोले हे आज उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असताना सभाव्य कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसंदर्भात जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासोबत बैठक घेऊन सध्याच्या काळात कायकाय सुविधा आहे,याचा आढावा घेणार आहे.

काँग्रेस कार्यकत्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्यात चैतन्याची लाट निर्माण होईल आणि काँग्रेस एक नंबर पक्ष होईल, असा विश्वास माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी निर्माण केला.

काँग्रेसमध्ये घरवापसी होणार

महाराष्ट्रात नाना पटोले स्टाईल कार्यकर्त्यांमधून येण्यासाठी हा दौरा सुरु केला आहे. भाजपमध्ये गेलेले कार्यकर्ते पुन्हा काँग्रेसमध्ये भविष्यात घर वापसी होणार असून, काँग्रेसला भविष्य असून, येणार्‍या काळात धक्कादायक प्रवेश करणार्‍यांची संख्या राहणार आहे. असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, जिल्हा परिषद, महानगरपालिका अशा विविध निवडणुका आगामी काळात होणार आहे. त्या दृष्टीने काँग्रेसची बांधणी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा जळगाव जिल्हा दौरा महत्वपुर्ण ठरणार आहे. जळगाव शहराला महानगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असून, त्यावर वरिष्ठ स्तरावर निर्णय होणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *