Saturday, April 27, 2024
Homeराजकीयराज्य सरकारचा हम करेसो कायदा

राज्य सरकारचा हम करेसो कायदा

पुणे(प्रतिनिधि)

ओबीसी आरक्षणाला धक्का लावून मराठा समाजाला समाधान मिळणार नाही, मराठा आरक्षण असो किंवा इतर विषय, महाविकास आघाडी सरकार अभ्यास करत नाही, सल्ला घेत नाही, हम करेसो कायदा सारखं वागते आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

- Advertisement -

दरम्यान, मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडायला तयार नाहीत याचा पुनरुच्चार करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुणे महापालिकेत कचऱ्याच्या प्रश्नावर आयुक्तांची भेट घेतली या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मराठा आरक्षणाबाबत बोलताना पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सर्वांनी चर्चा करून निर्णय घ्यावा लागणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावून मराठा समाजला समाधान मिळणार नाही. दरम्यान, विद्यार्थी फी या मुद्द्यावर दोन्ही राजे बोलताना दिसत नाहीत याबाबत छेडलं असता दोन राजे खासदार असलेल्या पक्षाचा मी अध्यक्ष आहे. मी बोललो म्हणजे सगळे खासदार,आमदार बोलले असे समजा असे उत्तर पाटील यांनी दिले.

राज्यपाल भाजपला झुकत माप देतात अशी चर्चा आहे तर त्याबाबत राज्यपालांनाच विचारा मी त्यावर बोलणार नाही, राज्यपाल पदाची गरिमा राखली गेली पाहिजे, अशी चर्चा करणारे, ती राखत नाही मात्र राज्यपालांबाबत असे मी असे बोलणार नाही अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

सीमावासीय मराठी बांधवांना त्रास होणार नाही यासाठी दोन्ही सरकारांनी बसून मार्ग काढावा

पाटील म्हणाले, बेळगावमधील आठशे गावातील लोकांची आजही महाराष्ट्रात यायची इच्छा आहे. यावर चर्चा करुन मार्ग काढणे आवश्यक आहे. दोन्ही राज्यांच्या सरकारांनी बसून सीमावासीय मराठी बांधवांना त्रास होणार नाही यासाठी मार्ग काढायला हवा. महाराष्ट्र, कर्नाटक सीमा प्रश्न 9 न्यायाधीशांच्या घटनापिठाकडे प्रलंबित आहे, सीमाभागातील 850 गावं महाराष्ट्रात आली पाहिजे अशी आमची भूमिका आहे, हा प्रश्न राज्य सरकार व केंद्र सरकारच्या हातात राहिलेला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात निकाल लागेपर्यंत सीमेवरील मराठी भाषिकांना कसं त्रास कमी होईल ही बघितले पाहिजे असे ते म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार द्या

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वी पगार द्यायला हवा असे सांगत आमचे सरकार जाण्यापूर्वी 500 कोटी रुपयांची मदत एसटीला केली होती,आता कर्ज काढावे लागेल म्हणत असतील तर एसटी स्टँडस तारण ठेवावी लागतील असे ते म्हणाले. एकनाथ खडसे यांचा विषय आमच्या दृष्टीने संपला असल्याचे सांगत त्यांनी याविषयावर बोलणे टाळले.

मुबई लोकल बाबत बोलताना पाटील म्हणाले, राज्य आणि केंद्रात काही संघर्ष आहे असं म्हणता येणार नाही. नियमानुसार निर्णय घेतले जात आहेत जसे महिलांसाठी सेवा सुरू केली तसेच इतर सेवा सुरू होतील.

पुण्यातील कचरा प्रश्नांबाबत बोलताना पाटील यांनी विकेंद्रित कचरा विल्हेवाट हाच पुण्यातील कचरा प्रश्नावर उपाय असल्याचे मत मांडले. पुण्याच्या आंबेगाव मध्ये कचरा प्रकल्प प्रक्रिया नागरिकांनी पेटवल्याची घटना रविवारी घडली. त्या पार्श्वभूमीवर वॉर्डातल कचरा वॉर्डातच जीरवण्याचे प्रयत्न गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या