
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील ( Konkan and Western Maharashtra ) अतिवृष्टी तुझेच पूरग्रस्तांसाठी ( flood victims )राज्य सरकारने जाहीर केलेले ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक असून सरकारने या पद्धतीने पूरग्रस्तांची थट्टा करू नये, अशी जळजळीत टीका भाजपचे नेतेआणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Former Finance Minister Sudhir Mungantiwar ) यांनी बुधवारी केली.
राज्य सरकारने काल पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली. या मदतीवरून मुनगंटीवार यांनी सरकारवर हल्ला चढवला. प्रत्यक्षात या मदतीमधील ७ हजार कोटी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी तर ३ हजार कोटी पुनर्बांधणी, पुनर्वसनासाठी आहेत. ७ हजार कोटींची उपाययोजनारूपी मदत म्हणजे स्वप्नांचे इमले रचण्याचाच प्रकार आहे , असा टोला मुनगंटीवार यांनी बुधवारी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात लगावला आहे.
अर्थ पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्तांसाठी केवळ १ हजार ५०० कोटींची तातडीची मदत करण्यात आली आहे. या मदतीतून पुराचा आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांच्या हाती फारसे काहीच लागणार नाही, असे म्हटले आहे.
३१ ऑगस्ट २०१९ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पूरग्रस्त जनतेसाठी मदतीचा जो शासन आदेश काढला होता. त्यातही आघाडी सरकारने कपात केल्याचे दिसते आहे. आमच्या सरकारने पूर, अतिवृष्टीमुळे ज्यांची घरे राहण्यायोग्य राहिली नव्हती अशा लोकांना शहरी भागात ३६ हजार तर ग्रामीण भागात २४ हजार रुपये एकरकमी घरभाडे म्हणून दिले होते. ज्यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती अशांना ९५ हजार १०० रुपये धनादेशाद्वारे देण्यात आले होते, याची आठवण त्यांनी करून दिली आहे.
आघाडी सरकारने संकटग्रस्तांना घरभाडे दिलेले नाही तसेच ज्यांची घरे पूर्णतः बाधीत झाली आहेत अशांनाही योग्य मदत दिली नाही. शेतकऱ्यांना आमच्या सरकारने दिलेल्या मदतीपेक्षा कमी मदत आघाडी सरकारने दिली आहे.आमच्या सरकारने ५ ब्रास मुरूम आणि ५ ब्रास वाळूही मोफत दिली होती, असे मुनगंटीवार यांनी पत्रकात नमूद केले आहे.