'राज्यातले सरकार हे दिशाहीन सरकार'

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका
चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

पुणे(प्रतिनिधी)

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अगोदरच का घेतला गेला नाही असा सवाल करत राज्यातले सरकार हे दिशाहीन सरकार आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.सरकारमध्ये कोणी ही जबाबदारी घ्यायला तयार नाही मुख्यमंत्री तर मातोश्री मध्येच बसलेले असतात असा टोलाही पाटील यांनी लगावला. भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते.

मराठा समाजाला न्याय कधी मिळणार? सर्वोच्च न्यायालयात जाऊन स्थगिती कधी उठवणार,? एक महिना झाला पण हे सरकार काही ही करत नाही, हे सरकार कोरोनाबाबत गंभीर नाही, शेतकरी प्रश्नाबाबत, महिला वरील अत्याचाराच्या घटनांबाबत गंभीर नाही विद्यार्थ्याबाबत गंभीर नाही अशीही टीका चंद्रकांत पाटील यांनी केली..

मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकणे हे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोघांसाठी चुकीचे ठरेल, मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करा असे वडेट्टीवार बोलले असतील तर त्यांनी आधी ओबीसी समाजाला त्यांना चालणार आहे का हे विचारावे. अन्यथा असे झाले तर गावो गाव संघर्ष होतील असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच राज्यात लवकरच भाजपच सरकार येईल या भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला असल्याचे पाटील म्हणाले.

अजितदादा आम्ही पण तुमचे बाप आहोत

दरम्यान, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना चंद्रकात पाटील यांनी पुणे महानगर पालिकेच्या काल झालेल्या प्रभाग समितीचा संदर्भ देत, अजित पवारांना स्वप्न पडत असतील तर उर्जा वाया घालवू नका, आम्ही पण तुमचे बाप आहोत असा टोला लगावला.

काल पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६ पैकी ११ ठिकाणी भाजपाचे सदस्य विजयी झाले. तर एक जागा टॉसवर काँग्रेसकडे गेली असून अन्य चार जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य विजयी झाले आहेत. याचा संदर्भ देत पाटील म्हणाले, प्रभाग समितीच्या निवडणुकीत काहीतरी जादू करून सर्व जागांवर भाजपाचे अध्यक्ष झाले पाहिजे होते. मात्र, तसे झाले नाही. पण अजित पवार यांना पुढची काही तरी स्वप्नं पडत आहेत, त्यांनी जास्त ऊर्जा वाया घालवू नये आम्ही देखील अजित पवार यांचे बाप आहोत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीत २८२ आणि सन २०२०च्या निवडणुकीत ३०३ जागा मिळाल्या. आता स्वपक्षाचे ३०३खासदार आणि मदत करणारे सहयोगी खासदार सध्या १०३ वरुन १५३ आहेत, अशा एका प्रचंड मोठ्या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. जगात भाजपा हा सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे असा दावाही त्यांनी केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com