SSR : गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सीबीआयला निवेदन

सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहे
SSR : गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सीबीआयला निवेदन

मुंबई | Mumbai

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात(sushant singh rajput death case) सध्या CBI तपास करत आहे. हे प्रकरण आता ड्रग्स कनेक्शन समोर आल्याने एनसीबीने रियासह अन्य लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावरुन राजकारणही तापले आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख(home minister anil deshmukh) यांनी संदीप सिंह आणि भाजपा(sandip singh and bjp relation) यांच्यातील संबंधांची चौकशी करण्यासाठी सीबीआय ला निवेदन दिले आहे. गृहमंत्री बोलताना म्हणाले,"पंतप्रधान मोदींची बायोपिक 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाचा निर्माता संदीप सिंह आणि भाजपा यांच्यातील संबंधांची चौकशी करण्यासाठी मला बर्‍याच विनंत्या व तक्रारी आल्या आहेत, त्यानंतर मी बॉलिवूड आणि ड्रग्जशी त्याच्या संबंधाबद्दल तपासासाठी सीबीआयकडे त्या तक्रारी पाठवणार असल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले." यामुळे संदीप सिंहच्या अडचणीत होण्याची शक्यता आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्जच्या विषयावरुन आता भाजपाचे आमदार राम कदम(bjp mla ram kadam) यांनी बॉलिवूडमधील ड्रग्जच्या नेक्ससची चौकशी करावी अशी मागणी केली होती. कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(cm uddhav thackeray) यांना यासंदर्भात पत्र पाठलं आहे. त्याचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. याच फोटोवर रिप्लाय करताना काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा संदीप सिंहबरोबरचा फोटो पोस्ट करत या प्रकरणामध्ये राज्य सरकारने भाजपा(BJP) अँगलनेही तपास करावा अशी मागणी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com