SSR : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा
राजकीय

SSR : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा

आणखी काय म्हणाले किरीट सोमय्या...

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

आज सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला. मुंबई पोलिसांसह (mumbai police) महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या (bjp leader kirit somaiya) यांनी

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (home minister anil deshmukh) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. किरीट सोमय्या यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fhadanvis) व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांना Twitter वर Tag करत ही मागणी केली आहे.

किरीट सोमय्या यांनी मध्ये म्हंटले आहे की, 'महाराष्ट्रचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. मुंबई पोलिस कमिश्नर यांनी 2 महिने एफआयआर न घेणे दुर्देवी आहे. सुशांत सिंग परिवारला न्याय मिळेल.'

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com