SSR case : आ.रोहित पवार यांची भाजपावर अप्रत्यक्ष टीका

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाला आज नवे वळण मिळाले
SSR case : आ.रोहित पवार यांची भाजपावर अप्रत्यक्ष टीका

मुंबई | Mumbai

AIIMS च्या डॉक्टरांच्या एका पॅनलने सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणातील अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, सुशांत सिंह राजपूत याची हत्या झालेली नाही तर ती आत्महत्याच असल्याचे म्हटले आहे. एम्सच्या डॉक्टरांनी दिलेल्या या अहवालामुळे आता सीबीआयचं पथक आत्महत्येच्या अँगलने या प्रकरणाचा तपास करेल. या अहवालाचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करीत भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

त्यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, "बिहार निवडणुकीसाठी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर AIIMS च्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी."

तसेच काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी सुशांत प्रकरणाची सीबीआय तपासाची मागणी केली होती. तसेच पार्थ पवार यांनी त्या 'सत्यमेव जयते" ट्वीट केले होते. पार्थ पवारांच्या या मागणीवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे चांगलेच संतापले होते. रोहित पवार यांनी आज केलेल्या ट्वीटमध्ये सत्यमेवजयते असा हॅशटॅगही वापरला. यामुळे रोहित पवार यांनी पार्थ पवार यांना देखील टोला लागावाल्याची चर्चा सोशल मिडीयावर रंगली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com