Sunday, April 28, 2024
Homeराजकीयशेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता म्हणून ‘जय बळीराजा’ बोला - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे...

शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता म्हणून ‘जय बळीराजा’ बोला – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

आपला देश कृषीप्रधान आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा (agricultural sector)वाटा महत्वाचा आहे. पण शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. जीडीपी घरसत असताना तो सावरण्याएवेजी डीपी बदलण्याचे आवाहन केले जात आहे. जगाच्या पोशिंद्याकडे दुर्लक्ष होता कामा नये यासाठी तसेच बळीराजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बोलताना सर्वांनी ‘जय बळीराजा’ ( Jai Baliraja )म्हणावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole)यांनी मंगळवारी केले.

- Advertisement -

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar)यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी फोनवर बोलताना ‘हॅलो’ ऐवजी वंदे मातरम’ ( Vande Mataram) म्हणावे, असा फतवा दिला आहे. यावर पटोले यांनी आज पत्रकारांशी बोलताना टीका केली. ते म्हणाले की, ‘वंदे मातरम्’ बद्दल आम्हाला आक्षेप असण्याचे कारण नाही. आम्हाला त्याचा अभिमानच आहे. पण त्यासाठी कोणावर जबरदस्ती करता येणार नाही. शेतकरी आपल्या देशाचा कणा आहे त्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

महत्वाचे विषय दुसरीकडे वळवण्यासाठी धर्माच्या आधारावर काही मुद्दे पुढे केले जात असतील तर ते बरोबर नाही. आपल्या देशाचा अन्नदाता असुरक्षित आणि दुर्लक्षित आहे, जीडीपी शेतीवरच आधारीत आहे जीड़ीपी ऐवजी डीपी बदल्यास सांगितले जाते म्हणूनच आम्ही बोलताना सर्वांनी बळीराजाची आठवण रहावी म्हणून जय बळीराजा बोलावे अशी भूमिका घेतली आहे, असे पटोले यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, अतिवृष्टीने राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. पण अजून पंचनामे झालेले नाहीत. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे, हेक्टरी ७५ हजार रुपये द्यावेत ही आमची मागणी आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरू आणि शेतकऱ्याला भरीव तसेच तातडीने मदत देण्यास राज्य सरकारला भाग पाडू, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या