UP election : भाजपाचं जशास तसं उत्तर; थेट यादवांच्या घरातच लावला सुरुंग

UP election : भाजपाचं जशास तसं उत्तर; थेट यादवांच्या घरातच लावला सुरुंग

दिल्ली | Delhi

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election 2022) आता शहकाटशाह आणि फोटोफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. अनेक मंत्री आणि आमदारांनी भाजप (BJP) सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यामुळे भाजपने आता समाजवादी पक्ष प्रमुखांच्या घरातच सुरुंग लावला आहे.

मुलायम सिंग यादव (mulayam singh yadav) यांची सून अपर्णा यादव (aparna yadav) यांनी भाजपामध्ये (bjp) प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे काही आठवड्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीआधी समाजवादी पक्षाला (sp)मोठा धक्का बसला असून राजकीय वातावरण अजून तापण्याची शक्यता आहे. दिल्लीमधील भाजपा कार्यालयात उत्तर प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

अपर्णा यादव या मुलायम सिहांचा लहान मुलगा प्रतीक यादव यांच्या पत्नी आहे. त्यांनी अनेकदा उघडउघड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची स्तुती केलेली आहे. अपर्णा यादव यांनी २०१७ मध्ये लखनऊ कैंटमधून विधानसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांना रीटा बहुगुणा जोशी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. गेल्या काही दिवसांपासून अपर्णा या भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. प्रतीकची आई साधना गुप्ता या मुलायम सिहांची दुसरी पत्नी आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com