बिहार निवडणूक : सोनिया, राहुल आणि प्रियंका काँग्रेसचे स्टार प्रचारक

करोना संकटकाळात देशात होणारी पहिली निवडणूक
बिहार निवडणूक : सोनिया, राहुल आणि प्रियंका काँग्रेसचे स्टार प्रचारक

नवी दिल्ली -

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा आणि खासदार राहुल गांधी स्टार प्रचारक

आहेत. याशिवाय गुलाम नबी आझाद, सचिन पायलट आणि शत्रुघ्न सिन्हा यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. याशिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अशोक गेहलोत, तारिक अन्वर, रणदीप सुरजेवाला हेही स्टार प्रचारक असणार आहेत.

दरम्यान, बिहार विधानसभेची निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून 10 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com